आदित्य ठाकरेंच्या लग्नाच्या प्रस्तावालाही स्थगिती : सुधीर मुनगंटीवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Feb-2020
Total Views |
Sudhir Mungantiwar _1&nbs
 
 
 
 
 
 
मुंबई : आदित्य ठाकरे यांच्या लग्नाच्या प्रस्तावालाही स्थगिती दिल्याचा उपाहासात्मक टोला माजी अर्थमंत्री व भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर लगावला आहे. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेतृत्त्वाखालील महाविकासआघाडी सरकार हे स्थगिती सरकार असल्याची टीका केली. मुंबईतील महाआघाडी सरकारविरोधात आयोजित केलेल्या भाजपच्या राज्यव्यापी एल्गार आंदोलनात ते सहभागी झाले.
 
 

अडीच लाख कार्यकर्त्यांचा एल्गार

राज्यातील महाआघाडी सरकारच्या नाकर्त्या कारभाराविरोधात तसेच राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यात सुमारे ३५५ ठिकाणी झालेल्या धरणे आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मंगळवार दि.२५ फेब्रुवारी रोजी झालेल्या आंदोलनात अडीच लाखाहून अधिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
 
 
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज आहिर या मान्यवरांसह पक्षाचे खासदार, जिल्हा, तालुका, महानगर, शहर पातळीवरचे पदाधिकारी तसेच जि.प.अध्यक्ष, महापौर, नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती, जि.प., पंचायत समिती सदस्य, नगरसेवक या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. पक्षाच्या सर्व आमदारांनी मुंबईत आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनात सहभाग घेतला. सामान्य जनतेनीही या आंदोलनाला प्रतिसाद देत महाआघाडी सरकारच्या विरोधातील असंतोष प्रकट केला.
 
 
"महाआघाडी सरकारने भाजप सरकारच्या सर्व कल्याणकारी योजना रद्द केल्या आहेत. जनादेशाचा घात करत स्थापन झालेल्या या सरकारने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली आहे. अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या मदतीपेक्षा एक रुपयाचीही जादा मदत महाआघाडी सरकारने दिलेली नाही. महाआघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर गुन्हेगारांना धाक न उरल्याने महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशा निष्क्रिय आणि फसवाफसवी करणाऱ्या सरकारच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय नवी मुंबई येथे नुकत्याच झालेल्या राज्य परिषदेच्या अधिवेशनात घेण्यात आला होता. त्यानुसार आज हे आंदोलन करण्यात आले, अशी माहिती भाजपचे कार्यालय सचिव मुकूंद कुलकर्णी यांनी दिली.









@@AUTHORINFO_V1@@