केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यात बैठक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Feb-2020
Total Views |

delhi meet _1  




नवी दिल्ली
: दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. शहा यांनी हिंसाचार रोखण्यासाठी काटेकोरपणे पाऊले उचलण्यास सांगितले. दिल्ली पोलिसांना अनेक सूचना दिल्या आहेत. गृहमंत्री अमित शहा यांच्या उच्चस्तरीय बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. हिंसाचार पसरविणाऱ्या संशयितांवर बारीक नजर ठेवण्याचा सल्ला त्यांनी पोलिसांना दिला आहे. सोशल मीडियावर आणि सोशल साइटवर अफवा पसरविणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवण्यात यावे असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे. या बैठकीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह उपराज्यपाल अनिल बैजल, आयबी चीफ अरविंद कुमार, गृहसचिव अजय कुमार भल्ला, दिल्लीचे पोलिस आयुक्त अमूल्य पटनायक, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष मनोज तिवारी, कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष सुभाष चोप्रा आदी उपस्थित होते.


शांतता समित्यांची स्थापना


अमित शाह यांनी शांतता समित्यांच्या स्थापनेसाठी सूचना जारी केल्या आहेत. पोलिस आणि स्थानिक आमदार यांच्यात चांगले समन्वय साधण्यासाठीची मागणी समोर येत आहे. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींकडील माहितीच्या आधारे पोलिसांना कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक सर्विलांसद्वारे नजर ठेवणे. ड्रोनद्वारे हिंसा प्रभावित भागात कडक पहारा देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.


निमलष्करी दले वाढविण्यात येणार


गृहमंत्र्यांनी हिंसाचार थांबविण्यासाठी निमलष्करी दलात वाढ करणार असल्याचे म्हटले आहे. ते म्हणतात की पोलिस दलाला पाठिंबा देण्यासाठी अधिक निमलष्करी दले सहकार्य करतील. यासह हिंसाचार आणि अफवा पसरविणारऱ्याना अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


बैठकीत सर्व राजकारणापेक्षा दिल्लीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व पक्षांनी प्रयत्न केले पाहिजेत यावर सामूहिक संमती झाली. दिल्ली पोलिसांना हिंसा रोखण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे नागरिकत्व कायद्यासंदर्भात गेल्या अडीच महिन्यांपासून दिल्लीत विविध ठिकाणी निदर्शने सुरू आहेत, परंतु मागील दोन दिवसांपासून पूर्व दिल्लीतील भजनपुरा, मौजपूर, सीलमपूरमध्ये हिंसाचार वाढला आहे. बातमी लिहिली जात असताना दिल्ली पोलिस कर्मचार्यां सह ५ जणांचा मृत्यू झाला. ही घटना जसजशी वाढत गेली, तसे सोमवारी रात्री उशिरा गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या निवासस्थानी अधिकाऱ्यासमवेत ही बैठक घेतली.


त्या बैठकीस गृहसचिव ए.के भल्ला, आयबी चीफ, दिल्ली पोलिस आयुक्त आणि इतर उपस्थित होते. दिल्ली हिंसाचारामुळे गृहमंत्री शाह मंगळवारी सकाळी ट्रम्प यांच्या समारंभात जाऊ शकले नाहीत. सकाळपासूनच त्यांनी दिल्ली पोलिसांशी समन्वय साधला आणि हिंसाचार रोखण्याच्या प्रयत्नात व्यस्त होते. दुपारी १२ वाजता गृहमंत्री शहा यांनी दिल्लीतील सर्व पक्षांसह एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
@@AUTHORINFO_V1@@