दंतसंरक्षणाय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Feb-2020
Total Views |
dental care_1  



‘आरोग्य’ या सदरांतर्गत आपण दर मंगळवारी भेटत आहोत. परवा सहजच विंदा करंदीकरांची एक कविता आठवली. ‘तुझी माझी धाव आहे, दाताकडून दाताकडे’ माझ्या मनात विचारचक्र सुरू झाले. विंदांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान मनाला भावले. शांत पाण्यात दगड भिरकावला की एकातून एक तरंग निर्माण होतात, तसं विचारांच्या गर्तेत माझ्या मनात ‘दात’ हा विषय घोळू लागला. ‘विको’च्या परिवारात आयुर्वेदाला अढळ स्थान आहेच. आमची सर्व उत्पादने ही ‘ग्राहक हिताय ग्राहक सुखाय’ या तत्त्वावर आधारित आहेत. कुंदकळ्यांसारखे शुभ्र दात, मोत्यासारखे दात किती भाग्यवंतांना लाभतात? मधुबाला ते माधुरी त्यांच्या मोहक हास्यामुळे आजही रसिकमनात त्या राज्य करीत आहेत. चेहर्‍याचे सौंदर्य एकसारख्या शुभ्र दंतपंक्तीमुळे द्विगुणित होते.


स्वच्छ, सुंदर, निरोगी दात हे कोणत्याही वयोगटातील व्यक्तीच्या सौंदर्याचा एक मापदंड ठरू शकतो, असे नैसर्गिक सौंदर्य कोणालाही मोहित करते. आपल्या सौंदर्याबाबत आणि आरोग्याबाबत केवळ तरुण-तरुणीच नव्हे तर सगळ्याच वयोगटातील जागरुकता वाढली आहे. कोणत्याही प्रकारचे लाभलेले सौंदर्य हे निसर्गदत्त वा परमेश्वरी वरदान असते. इतरांना हेवा वाटणे स्वाभाविक आहे. परंतु, जे प्राप्त झाले आहे त्याची योग्य काळजी घ्यावी. दातांचे सौंदर्य आपले व्यक्तिमत्त्व निश्चितच प्रभावी बनवते. परंतु, आरोग्याच्या द़ृष्टीने ‘दात’ हा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे. तोंड हे पचनसंस्थेचे प्रवेशद्वार आहे. मुखाचे आरोग्य हे एकूणच आरोग्याच्या द़ृष्टीने महत्त्वाचे आहे. दातांचा प्रामुख्याने उपयोग होतो तो चर्वणासाठी! त्यामुळे दात व हिरड्या हे घटक महत्त्वाचे ठरतात. खराब झालेले दात, किडलेले दात, वेडे-वाकडे दात, पुढे आलेले दात, हिरड्यांचे आजार यामुळे व्यक्ती संत्रस्त होते. ठणकणार्‍या दाढेपुढे जगातील कोणतंही दु:ख फिकं पडतं! अशावेळेस दंतवैद्य हा देवदूतासारखा वाटू लागतो. कोणतीही वेदना त्रासदायक असतेच, पण दातांच्या दुखण्यामुळे एखादी व्यक्ती हवालदिल होते. आपण प्रत्येकाने कधी ना कधी असा अनुभव घेतला असेलच! अगदी हाडवैर्‍यावरदेखील ‘दंतदुखी’ची वेळ येऊ नये.


दातांची समस्या उद्भवू नये यासाठी कोणत्या प्रकारची काळजी आपण सर्वांनी घ्यावयास हवी? सर्वात मुख्य म्हणजे आपला आहार चौरस असावा. तुटलेले दात, नीट न बसणारे कृत्रिम दात, तंबाखू, पान, सुपारी, मावा, गुटखा यासारख्या घातक सवयींमुळे तोंडात जखमा होतात. तोंडातील अंतत्वचा संवेदनशील असते. त्यामुळे योग्य उपचार करून घेणे आणि आरोग्याला घातक ठरणारे पदार्थ सेवन न करणे हे यावरचे उपाय आहेत. Prevention is better than cure! मराठीत एक म्हण आहे ‘वेळीच एक टाका घातलात तर बाकीचे टाके वाचतात’ Stitch at time saves nine! पण आपली इथेच गल्लत होते़ आपण दुर्लक्ष करतो. बायकांना आजार अंगावर काढायची सवय असते. आपली मानसिकता आपण बदलली तरी बराच फरक पडेल असे वाटते. दररोज किमान दोन वेळा दात टूथब्रश आणि चांगल्या प्रतीच्या पेस्ट/पावडरने स्वच्छ करावेत. प्रत्येक खाण्यानंतर खळखळून चुळा भराव्यात. लहानपणापासूनच वर्षातून दोनदा दंतवैद्याकडून नियमित तपासणी करून घ्यावी. योग्यवेळी योग्य ते उपचार करणे फार महत्त्वाचे आहे. आपल्या दातांचे आरोग्य चांगले नसेल तर इतर सर्व पथ्य पाळूनही शरीराला व्याधी जडू शकतात. त्यामुळे दातांची सुरक्षा अन् सुरक्षिततेसाठी दातांचे विकार होऊ नयेत म्हणून घ्यावयाची काळजी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे.


साधारणपणे दातांचे विकार दोन प्रकारचे असतात. हार्ड टिश्यू (दात) आणि सॉफ्ट टिश्यु (प्रामुख्याने हिरड्या, ओठ, जीभ, इपिथेलियम म्हणजे मुखाची त्वचा). यातील हार्ड टिश्यूचे विकार म्हणजे दातांना कीड, दातांची झीज, दात तुटणे तर सॉफ्ट टिश्यूचे विकार म्हणजे हिरड्यांना सूज येणे, तोंड येणे, पायोरिया वगैरे. दातांचे प्रमुख काम म्हणजे चर्वण. काही शब्दांचे उच्चार आणि गाल/ओठ यांना आधार देऊन व्यक्तीच्या चेहर्‍याचा योग्य आकार देणं याखेरीज दुधाच्या दातांचे काम असते पक्क्या दातांकरिता पाया तयार करणे.


‘मसुडों में जान तो दातों की शान’ या पंक्तीने ‘विको वज्रदंती पावडर’ सर्वसामान्यांच्या घराघरात पोहोचली. दंतमंजन ही संकल्पना फार पूर्वीपासून वेगवेगळ्या स्वरुपात वापरली जात असे. त्यावेळी लोकांची जीवनशैली भिन्न होती. आहारपद्धतीत विभिन्नता नव्हती. सरळमार्गी जीवन होते. साधी राहणी होती. पूर्वसुरींनी घालून दिलेल्या नियमांवर समाज चालत होता. ‘जंक फूड’ पद्धती अस्तित्वात आली नव्हती. कोणी स्वप्नातदेखील अशा प्रकारच्या जगण्याचा विचार केला नव्हता, ‘कालाय तस्मै नम:।’ सगळंच बदलत गेलं आणि ते ते आपण स्वीकारत गेलो.


‘विको वज्रदंती पावडर’ बनविण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले होते. संपूर्णपणे आयुर्वेदाचा बेस असलेले हे उत्पादन हळूहळू भाव खाऊन गेले. कारण, याची प्रचिती लोकांना आली. दंतमंजन असेही असू शकते, यावर लोकांचा विश्वास बसत नव्हता. एक-दोन नव्हे तर तब्बल १८ आयुर्वेदिक औषधींचा यात वापर केला जातो़ बाभूळ, जांभूळ, लवंग, मंजिष्ठा, दालचिनी, वज्रदंती, अक्रोड, बोर, खैर, बकुळ, ज्येष्ठमध, अनंतमूळ, त्रिफळा, अक्कलकाढा, ओवा, पतंग, साखर आणि मीठ अशा वनस्पतींचा औषधी वापर केला जातो. The oldest natural formula of ayurveda. ही वज्रदंती पावडर ग्राहकाला No side effectsची हमी देते. ग्राहकांनी या उत्पादनाला सर्वप्रथम मनात आणि त्यानंतर घरात मानाचे स्थान दिले. संपूर्ण कुटुंबाच्या दातांची निगा राखण्याची हमीच ‘विको’ने घेतली. कोणत्याही व्यक्तीच्या दिवसाची प्रसन्न सुरुवात दंतमंजनापासून होते आणि ती अद्वितीय औषधी चव तुमच्या मुखाचा, दातांचा आणि मनाचा ताबा घेते. एक नैसर्गिक सुरक्षाकवच तुमच्या तोंडात निर्माण होते. तुमच्या हिरड्यांवर ही पावडर लावून त्यावर बोटाने हलक्या हाताने मसाज करावा. दोन मिनिटे मसाज झाला की पाच मिनिटे थांबून चूळ भरुन तोंड धुवावे. वेगवेगळ्या औषधी वनस्पतींच्या गुणधर्माने मुखामध्ये चेतना निर्माण होते. त्याचा उग्र वाटणारा, हवाहवासा दर्प दिवसभर चैतन्य निर्माण करतो़ ‘विको वज्रदंती पावडर’ने घराघरात मान्यता मिळवली होतीच पण कालसुसंगत बदल हे ‘विको’चे तत्त्व आहे ते ही स्वत:चा दर्जा कायम राखून! त्यानंतर नवी पिढी आली. जागतिक स्तरावरील बदल आता आपल्या देशात येऊ लागले. ‘विको वज्रदंती पावडर’सोबत ‘विको’ने ‘पेस्ट’ आणली आणि नवी पिढी सुखावली. दिवसाची सुरुवात Soft आणि Easy झाली. काळाबरोबर लोकांना Easyचे वेड लागले. त्यामुळे ‘विको वज्रदंती पेस्ट’चेही दणदणीत स्वागत झाले. पुढे आणखी बदल झाले. ‘मागणी तसा पुरवठा’ करावा लागतो. मधुमेही रुग्णांनी सर्व्हेमध्ये त्यांच्यासाठी काहीतरी वेगळे मागितले. त्यांची मागणी रास्त होती आणि ‘विको’ परिवाराने ‘विको वज्रदंती पेस्ट’ आणली ती ‘शुगर फ्री’ होती. दंतमंजनचे हे तिसरे भावंड होते. यात कटाक्षाने साखर, गोड पदार्थ वगळले गेले. यालाही भरघोस प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ‘पेस्ट’मध्येच ‘सौंफ आणि दालचिनी फ्लेवर’ आणून लोकांची हीदेखील मागणी पूर्ण केली. नित्यनूतन प्रयोग करावेत. त्यातून ग्राहकाला उपयोग व्हावा. त्यांची संतुष्टता हेच आमचे समाधान राहिले. मुखदुर्गंधी घालवणे, मुखअंतर्गत स्वच्छता आणि दातांचे संपूर्ण संरक्षण त्यामुळे व्यक्तिगत, कौटुंबिक हित जोपासले गेले. आज दंतचिकित्सेवरील खर्च कमालीचा वाढला आहे. त्यामुळे प्रत्येकाने काही सवयी पाळल्या, योग्य काळजी घेतली तर अनेक प्रश्न निर्माण होण्याआधीच सुटतील. समस्या येणारच, पण त्या धैर्याने आणि विचारपूर्वकच सोडवायला हव्यात. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव महत्त्वाचा आहे. आरोग्याची वैयक्तिक काळजी आपणच घ्यायला हवी. ‘दात’ तर फार महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांचे संरक्षण आपण करू आणि निरोगी जीवन जगू.
क्रमश:


- संजीव पेंढरकर
@@AUTHORINFO_V1@@