भालिवलीचे कंदील पोहोचले राष्ट्रपतींकडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Feb-2020
Total Views |
President-of-India _1&nbs



वनवासी महीलांचे राष्ट्रपतींकडून कौतुक

 


नवी दिल्ली : वनवासी भागात सामाजिक, शैक्षणिक व रोजगार निर्मितीसाठी कार्य करणाऱ्या 'विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर'च्या वनवासी भगिनींनी तयार केलेल्या पर्यावरण पूरक बांबूच्या आकर्षक वस्तू राष्ट्रपती व राज्यपाल भगतसिंग कोश्यारी  ह्यांना पुणे येथील राजभवनात भेटीदाखल देण्यात आल्या. यावेळी हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटरचे संचालक प्रदीप गुप्ता, व्यवस्थापक लुकेश बंड, प्रशिक्षण व विकास अधिकारी प्रगती भोईर तसेच वनवासी भगिनी निर्मला दांडेकर, वैशाली दांडेकर, प्रतीक्षा गोवारी व सुरेखा जाधव या राष्ट्रपती व राज्यपालांसमोर उपस्थित होत्या.
 
 
राष्ट्रपतीनी बांबू हस्तकलेचे कौशल्य पाहून वनवासी भगिनींचे मोठे कौतुक केले. तसेच त्यांना हस्तकलेमार्फत रोजगार मिळवून दिल्याबद्धल विवेक सेंटरच्या कार्याचेही कौतुक केले, पर्यावरणपूरक बांबू हस्तकलेच्या वनवासी भगिनींच्या मार्फत तयार करणाऱ्या वस्तूंचा अधिकाधिक उपयोग करून त्यांना प्रोत्साहित करावे असे आवाहनही केले.
 
 
 
'विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर'च्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून महिला सक्षमीकरणा करिता पालघर जिल्हातील वनवासी, गरजू महिलांना घरकाम सांभाळून आर्थिक हातभार लाभावा व त्यांना सन्मानजनक रोजगार प्राप्त व्हावा या हेतूने विवेक या संस्थेने पुढाकार घेत अशा महिलांना बांबू हस्तकलेचे मोफत प्रशिक्षण देत आहे. त्यांचाकडून पर्यावरणपूरक बांबू हस्तकलेच्या बहुउपयोगी निरनिराळ्या वस्तू तयार करतात.
 
 
 
विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर नावाची सामाजिक संस्था मागील ९ वर्षांपासून वनवासी महिलांना रोजगार प्राप्ती व्हावी म्हणून पालघर जिल्ह्यात कार्य करत आहे. यामध्ये बांबू हस्तकलेचा समावेश असून प्रशिक्षित महिला २१ प्रकारची आकर्षक उत्पादने तयार करत आहेत. त्यात ट्रे, आकाश कंदील, मोबाईल होल्डर , राख्या, फ्रुट बास्केट, पेपरवेट, टी-कोस्टर इत्यादी सारख्या आकर्षक वस्तूंची निर्मिती होत आहे. सदर उत्पादने हि उच्चं प्रतीची व दर्जेदार असल्याने त्यांना मागणीही भरपूर आहे.
 
 
 
सध्या संस्थेच्या मार्फत १३वे प्रशिक्षण वर्ग बोट गावात चालविण्यात येत असून यामध्ये अनेक प्रकारच्या बांबूच्या वस्तू यांसह राख्यांची निर्मिती करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या मोफत प्रशिक्षणातून आजपर्यंत १५०हुन अधिक महिलांना बांबूच्या वस्तूंसह बांबूच्या राख्या बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामध्ये ८० हुन जास्त महिलानी घरच्या घरीच आपला लघु उद्योग थाटला आहे. यामुळे प्रत्येक महिला महिन्यापोटी ५ हजार ते ८ हजारापर्यंत आर्थिक लाभांकीत होत आहे. बांबूच्या वस्तू बनविण्यासाठी लागणारे साहित्य, नैसर्गिक रंग हे सर्व संस्थेकडून उपलब्ध करून देण्यात येते.
 
 
 
 
या बनविलेल्या वस्तूंचा विक्री करण्यासाठी विक्री केंद्र देखील उपलब्ध करून दिले आहेत. यासाठी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सेंटरच्या भालिवली येथील राष्ट्र सेवा समितीच्या विक्री केंद्रावर थेट किंवा प्रगती भोईर यांच्या 7798711333 या भ्रमणध्वनीवरून मागणी करता येईल. तसेच एमेजन ह्या ऑनलाइन विक्री पोर्टल वर 'विवेक बांबू हॅन्डीक्राफ्ट' ह्या नावाने वस्तू उपलब्ध आहेत.







 
 
 
@@AUTHORINFO_V1@@