सनी हिंदुस्तानीने पटकावला ‘इंडियन आयडॉल ११’ चा किताब!

    24-Feb-2020
Total Views |
sunny_1  H x W:






रोहित राऊतने जिंकले उपविजेतेपद!

मुंबई : सोनी वाहिनीवरील ‘इंडियन आयडॉल’च्या ११ व्या पर्वाचे विजेतेपद सनी हिंदुस्तानीने सनी हिंदुस्तानीने पटकावले. सुवर्ण मानचिन्हासोबत सनीला टाटा अल्ट्रोज कार आणि २५ लाख रुपये बक्षीस मिळाले. या विजयानंतर सनीला आता हिमेश रेशमियाच्या आगामी चित्रपटात गाणे गाण्याची संधी मिळणार आहे.


मुळचा पंजाबच्या बठिंडा येथील असलेल्या सनी इंडियन आयडॉल कार्यक्रमामध्ये येण्याआधी बुट पॉलिश करण्याचे काम करत असे, तर त्याची आई फुगे विकण्याची कामे करत असे. अनेकदा परिस्थिती अशी यायची की दुसऱ्याच्या घरी तांदूळ मागावे लागत असे, सनीने कार्यक्रमा दरम्यान सांगितले होते. गरीबशी झगडणाऱ्या सनीच्या आवाजाचे या कार्यक्रमामुळे अनेक चाहते तयार झाले. कार्यक्रमाच्या परीक्षकांनी देखील त्याच्या आवाजाचे कौतूक केले आहे. एवढीच नाही तर त्याचे गाणे ऐकताना नुसरत फतेह अली खान यांची आठवण येते, असेही म्हटले.


सनीने कार्यक्रमादरम्यानच कंगना राणावतचा चित्रपट ‘पंगा’साठी गाणे गायले होते. जावेद अख्तर लिखित हे गाणे त्याने शंकर महादेवन यांच्यासोबत गायले होते. सनीने विजेतेपद आपल्या नावे केले, तर मराठमोळा, तरुणाईचा लाडका गायक रोहित राऊत या पर्वाचा उपविजेता ठरला.