पाकिस्तानने दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करावे : डोनाल्ड ट्रम्प

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Feb-2020
Total Views |

trump_1  H x W:



अहमदाबाद  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गर्दीने तुडुंब भरलेल्या अहमदाबाद येथील भव्य अशा मोटेरा स्टेडियमवर करोडो नागरिकांना संबोधित केले. यावेळी भारताच्या अनेक वैशिष्ठ्यांची स्तुती ट्रम्प यांनी केली. 'नमस्ते ट्रम्प'या कार्यक्रमास संबोधित केले. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममधून ट्रम्प यांनी पाकिस्तान आणि सीमेपलीकडील  वाढत चाललेल्या दहशतवादावर हल्ला चढविला.


भारत-अमेरिका दहशतवादाविरुद्ध लढा देण्यास वचनबद्ध

आमच्या नागरिकांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण करणाऱ्याना भारी किंमत मोजावी लागेल. ते म्हणाले, आपला देश इस्लामिक दहशतवादाचा बळी ठरला आहे, आम्ही त्या विरोधात लढा दिला आहे. भारत आणि अमेरिका दहशतवादाविरुद्ध लढा देण्यासाठी आणि आमच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी कटिबद्ध आहोत. ट्रम्प पुढे म्हणाले की, पाकिस्तानशी आमचे चांगले संबंध आहेत. आम्हाला वाटते की पाकिस्तान दहशतवादाविरोधात पावले उचलत आहे. संपूर्ण दक्षिण आशियासाठीच हे आवश्यक आहे. यात भारताला महत्त्वपूर्ण योगदान द्यावे लागेल.


इसिसचा म्होऱ्हक्या बगदादीला ठार मारले


ते म्हणाले की, कट्टरपंथी इस्लामिक दहशतवादापासून आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी आम्ही दोघे एकत्रित काम करणार आहोत. आम्ही इसिसचा म्होऱ्हक्या बगदादीला ठार मारले. आम्ही पाकिस्तानसमवेत सीमापार दहशतवाद संपविण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
 

भारताचा सर्वाधिक युद्धाभ्यास अमेरिकेबरोबर : पंतप्रधान


अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ट्रम्प यांनी भारताचा अभिमान वाढविला आहे. अमेरिकेबरोबर भारत सर्वाधिक युद्धाभ्यास करतो. आज ज्या देशासोबत भारताची सर्वात विस्तृत संशोधन आणि विकासाची भागीदारी आहे तो म्हणजे अमेरिका.



भारताने सर्वाधिक उपग्रह पाठविण्याचा विक्रम केला आहे
 : पंतप्रधान


पीएम मोदी म्हणाले, भारताने सर्वाधिक उपग्रह पाठविण्याचा विक्रम केला आहे. आमच्यातील मैत्रीची व्याप्ती प्रत्येक क्षेत्रात वाढत आहे. नवीन आव्हाने भारताच्या परिवर्तनाची पायाभरणी करीत आहेत. या दशकाच्या सुरूवातीला ट्रम्प यांचा भारत दौरा हा भारताचा सन्मान आहे. अमेरिका हा भारताचा सर्वात विश्वासार्ह भागीदार आहे. दहशतवादाला मिटविण्यासाठी आम्ही एकत्र आहोत. दोन्ही देशांमधील डिजिटल सहकार्य येत्या काळात वाढेल.


@@AUTHORINFO_V1@@