नरेंद्र मोदींशी पंगा घेणाऱ्या मलेशियाच्या पंतप्रधानांचा राजीनामा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Feb-2020
Total Views |

nahathir_1  H x



क्वालालंपूर
: मलेशियाचे पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांनी आज अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ९४ वर्षीय महाथिर यांनी सोमवारी (२४ फेब्रुवारी २०२०) देशाच्या राजाला आपला राजीनामा सादर केला आहे. मलेशियाच्या पंतप्रधान कार्यालयाने याबाबत माहिती दिली. मलेशियन पीएमओने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राजकीय द्वंदयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी आपला राजीनामा सुपूर्त केला आहे.


महाथिर यांनी पक्ष बेरास्तुने सरकारशी आघाडी तोडली आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून मलेशियाच्या राजकारणात द्वंद सुरु होते. २०१८ मध्ये महाथिर आणि अन्वर इब्राहम आयणी एकत्र येत सरकार स्थापन केले होते. कालांतराने महाथिर अन्वर यांच्याकडे सत्ता हस्तांतरित करणार असेही सांगण्यात आले होते. परंतु महाथिर यांनी आपली फसवणूक केली असल्याचा आरोप अन्वर यांनी केला. महाथिर मोहम्मद १० मी २०१८ला पंतप्रधान झाले होते. वर्ष १९८१ ते २००३पर्यंत ते देशाचे पंतप्रधान राहिले. त्यानंतर २०१८मध्ये पुन्हा ते पंतप्रधान झाले.


कलम ३७० हटविणे व नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या संबंधित भारतविरोधी भूमिका घेतली होती. यानंतर भारताने मलेशियाकडून पामतेल खरेदी करण्यावर बंदी आणली होती. मलेशियाचे पंतप्रधान असताना हिंदुविरोधी विष ओकणार्या आणि भारताच्या फरार झाकीर नाईकला आश्रय दिला. मुस्लिमांचे नवे मसिहा बनण्याच्या प्रयत्नात त्यांनी जम्मू-काश्मीरवरील संयुक्त राष्ट्र महासभेत खोटी विधाने करून भारतावर अनेक आरोप केले. रोहिंग्या मुस्लिमांवर कथित अत्याचार होत असल्याचे सांगितले. जम्मू-काश्मीरमध्ये आक्रमण करून ताब्यात घेण्यात आल्याचे महाथीर यांनी आपल्या भाषणात म्हटले होते. या प्रस्तावात कायद्याकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका संयुक्त राष्ट्र संघटनेवर ठेवत भारत म्हणाले की, शांततापूर्ण मार्गाने प्रश्न सोडविण्यासाठी भारताने पाकिस्तानबरोबर काम केले पाहिजे. मलेशियाने पाकिस्तान आणि तुर्कीसमवेत इंग्रजी भाषेत इस्लामिक टीव्ही चॅनेल सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.
@@AUTHORINFO_V1@@