पतमानांकनात ‘एलआयसी’ म्युच्युअल फंडाची बाजी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Feb-2020
Total Views |
LIC mutual Funds _1 
गेल्या २ वर्षात शेयर बाजारातील मोजके समभाग सोडले तर एकंदर बाजार खूप अस्थिर आणि खालच्या पातळीवर राहिला. बाजार अतिशय अस्थिर आणि खालच्या पातळीवर असताना म्युच्युअल फंडाचे निधी व्यवस्थापक कशी कामगिरी करतात ते पाहणे महत्वाचे ठरते. गुंतवणूकदारांनाही अशा कालावधी मध्ये योग्य योजनांची निवड करणे कठीण होऊन जाते. बाजारातील काही पतमानांकन संस्था आणि संशोधन संस्था निरनिराळे मापदंड वापरून योजनांची क्रमवारी नियमित जाहीर करीत असतात. क्रिसिल ह्या पतमानांकन करणाऱ्या संस्थेची डिसेंबर महिना अखेरची क्रमवारी जाहीर झाली. समभाग संबंधित योजनांच्या क्रमवारीत एलआयसी म्युच्युअल फंडच्या योजनांनी अतिशय सुरेख कामगिरी दाखविली. तब्बल ५ समभाग संबंधित योजनांनी CPR -१ हे उच्च रेटिंग प्राप्त केले. 
 
 
१) एलआयसी एमएफ लार्ज अँड मिडकॅप फंड
२) एलआयसी एमएफ टॅक्स प्लॅन
३) एलआयसी एमएफ मल्टिकॅप फंड
४) एलआयसी एमएफ इक्विटी हायब्रीड फंड
५) एलआयसी एमएफ इन्फ्रास्ट्रक्टचर फंड
६) एलआयसी एमएफ लार्ज कॅप फंड CPR -२ ही श्रेणी मिळविली.
 
 
डिसेंबरअंती सातत्यपूर्ण परतावा देणारे फंड घराणे म्हणून एलआयसी म्युच्युअल फंडाच्या ६ योजनांना मानांकन मिळाले. इतक्या जास्त योजना वरच्या श्रेणीत येणं ह्यामागे निश्चितच त्यांच्या निधी व्यवस्थापक टीम ची काही वर्षांची मेहनत पाठीशी असावी. आज ह्या फंड घराण्याचा आढावा घेऊ. एलआयसी म्युच्युअल फंड, म्युच्युअल फंड क्षेत्रातला सर्वात जुन्या युटीआय नंतर बाजारात उतरलेल्या ९०च्या दशकातील म्युच्युअल फंड घराणे. अगदी सुरवातीच्या ९०च्या काळात मुसंडी मारून कामकाज चालू करणाऱ्या ह्या म्युच्युअल फंड घराण्याला आपला समभाग संबंधित योजनांतील कामगिरी मध्ये सातत्य दाखविता आली नाही आणि ९५ सालानंतर बाजारात आलेल्या खाजगी आणि विदेशी म्युच्युअल फंडांनी सातत्यपूर्ण कामगिरी दाखवून एलआयसी म्युच्युअल फंडाला मागे खेचले. त्यानंतरच्या दशकात ह्या म्युच्युअल फंडाने प्रामुख्याने कर्जरोखे संबंधित म्युच्युअल फंड म्हणून बाजारात आपले स्थान बनवण्याचा चांगला प्रयंत्न केला. आपली समभाग संबंधित योजनांतील कामगिरी उंचावण्याकरिता एलआयसी म्युच्युअल फंडाने जपान मधील सर्वात मोठ्या नोमुरा संस्थेशी जवळीक साधली.
 
 
 
साधारण २०१३ सालच्या मध्यास नोमुराने भारतीय म्युचुअल फंड क्षेत्रातील अनुभवी निधी व्यवस्थापकांची नेमणूक करण्यास सुरवात केली आणि एलआयसी म्युच्युअल फंडाचे सध्याचे इक्विटी सी आई ओ सचिन रेळेकर यांची २०१३ साली निधी व्यवस्थापक म्हणून निवड केली. सचिन रेळेकर यांनी कामकाज चालू केले तेंव्हा त्यांना मागील १५-२० वर्षातील फंड घराण्याच्या, समभागातील सूमार कामगिरीतून नव्याने सुरवात करायची होती. सचिन रेळेकर यांनी आपली ३-४ जणांची इक्विटी संशोधन विश्लेषकांनी टीम बनवून पहिल्या ४ वर्षात ते सांभाळत असलेल्या योजनांना १ वर्ष आणि ३ वर्ष कालावधी मधील प्रभावी कामगिरीने बाजाराला एल आई सी म्युच्युअल फंड समभाग योजनांमध्ये कात टाकत असल्याची जाणीव करून दिली. मधल्या काळात एल आई सी म्युच्युअल फंडाने काही बदल पहिले. नोमुराने भारतीय बाजारातून माघार घेतल्यानंतरही सचिन रेळेकर यांच्या कामगिरीवर काही विपरीत परिणाम झाला नाही. नोमुराच्या समभाग संबंधित कार्यप्रणालीचा आणि जागतिक अनुभवाचा प्रभाव सचिन रेळेकर यांच्या
 
 
 
कामगिरीत वरचेवर दिसून येतो. त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे फंड घराण्याने त्यांना वर्षांपूर्वी इक्विटी सीईओ पदाची जबाबदारी सोपविली. गेल्या वर्षभरातील त्यांची कामगिरी पाहता बाजारातील निरनिराळ्या संशोधन संस्थांनी समभाग योजनांना उच्च मानांकन दिले. गेल्या दोन वर्षात जेंव्हा म्युच्युअल फंड क्षेत्रातील बहुतेक निधी व्यवस्थापक, आपल्या योजनांचा परतावा बेंचमार्क परताव्याशी कशी बरोबरी करेल, याची कसरत करीत असताना एलआयसी म्युच्युअल फंडाचा योजनांनी सर्वच समभाग योजनांमध्ये सातत्यपूर्ण भरीव कामगिरी केली. गेल्या दोन वर्षात शेयर बाजाराची वाटचाल पाहिल्यास जाणवते कि अगदी मोजकेच समभाग सोडले तर बाजार खालच्या पातळीवरच राहिला. खालच्या पातळीवरील बाजारातील सचिन रेळेकर यांची सातत्यपूर्ण कामगिरी नक्कीच वाखाणण्यासारखी आहे. गेल्या ५-७ वर्षात म्युच्युअल फंड क्षेत्रातल्या गुंतवणुकीचे, आकारमानाने मोठ्या असलेल्या ५-७ फंड घराण्याकडे ध्रुवीकरण झाले. मात्र गुंतवणूकदारांना मिळालेल्या परताव्याकडे पाहिल्यास लक्षात येते कि, गुंतवणूकदारांनी सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या आकारमानाने छोट्या व मध्यम आकाराच्या फंड घराण्याला सुध्दा पसंती देऊन आपल्या संपत्ती निर्माण कार्यात जास्त सतर्क राहिले पाहिजे.
 
 

- निलेश तावडे


९३२४५४३८३२ , [email protected]




(लेखक हे २० वर्ष म्युच्युअल फंड क्षेत्रात कार्यरत होते सध्या ते आर्थिक नियोजनकार आहेत.)







@@AUTHORINFO_V1@@