सीएए विरोधी आंदोलनात कॉन्स्टेबलचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Feb-2020
Total Views |

CAA protest_1  
 
 
 
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये सुरू असलेल्या सीएए आणि एनआरसी विरोधातील आंदोलनाला पुन्हा एकदा हिंसक वळण लागले. चांदबांग येथील आंदोलनस्थळी जमावाने केलेल्या दगडफेकीमध्ये जखमी झालेल्या एका पोलीस हेड कॉन्स्टेबलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रतन लाल असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून दडफेकीत ते गंभीर जखमी झाले होते.
 
 
अधिक माहितीसाठी हेही वाचा : - 
 
 
 
उत्तर पूर्व दिल्लीमध्ये सुरू असलेल्या सीएए आणि एनआरसी विरोधी आंदोलनामध्ये गेल्या तीन दिवसांपासून हिंसाचार सुरु आहे. सोमवारी सकाळपासून या परिसरामध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर दुपारी जमाव हिंसक झाला आणि त्यांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केली. या दगडफेकीमध्ये हेड कॉन्स्टेबल रतन लाल हे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता तिथेच त्यांचा मृत्यू झाला.
@@AUTHORINFO_V1@@