कला देशाचा कणा आणि ओळख : मनोज जोशी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Feb-2020
Total Views |
manoj joshi_1  




तिसरा ‘चित्रभारती लघुपट महोत्सव’ संपन्न


कर्णावती : “आज समाजमाध्यमांना लोकसंवादाचे सशक्त माध्यम म्हणून आपण अनुभवतो. माझे आवाहन आहे की, देशाच्या उज्ज्वल भवितव्याच्या मार्गात झारीच्या शुक्राचार्यासारखी ‘तुकडे तुकडे गँग’ अडसर आणत आहे, त्यांचेच तुकडे तुकडे होतील. या तरुणांतूनच उद्याचे प्रतिभावान कलावंत, दिग्दर्शक पुढे येतील. जसे सैनिक सीमेवर जागता पहारा देतात तसाच सर्जक देशाला कला, साहित्यातून तोडण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर जागता पहारा ठेवत कलामाध्यमातून देशाचा मूळ विचार अधिक दृढ करेल, असा मला विश्वास वाटतो. कला ही देशाचा कणा आणि ओळख असते,” असे मत ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांनी ‘चित्रभारती’ आयोजित ‘लघुपट महोत्सवा’वेळी व्यक्त केले.


‘चित्रभारती’तर्फे कर्णावती येथे तिसर्‍या ‘लघुपट महोत्सवा’चे आयोजन रविवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. यंदा या महोत्सवात २३ राज्यांतून २१ भाषा/बोलींतून ४६५ लघुपट आले होते. या कार्यक्रमात विविध प्रकारच्या राष्ट्रीय स्तरीय स्पर्धेच्या पुरस्कारांचे वितरण झाले. दरम्यान, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अब्बास आणि मस्तान यांनी पुरस्कार प्रदान केले. तसेच यावेळी त्यांनी भारतीय चित्रसाधनाचे आभार मानून स्पर्धकांचे अभिनंदन केले.


लघुपटांना विविध श्रेणीत मिळालेले पुरस्कार
प्रथम पुरस्कार : रू ५०,०००/- ‘ओ शिट’ (रूक्मिणी संन्याल, अभिषेक पांडे), द्वितीय : रू २५,०००/- ‘या देवी’- (रुक्मिणी संन्याल, सौरव रॉय चौधरी) तर तृतीय : संयुक्त रू १५,०००/- ‘दस दिन’- (दानिश केलकर) ‘ए फिजिकल टू मेल’ - उमेश पाणिग्रही यांना पारितोषिक मिळाले.



तसेच यात सर्वोत्कृष्ट लघुपट : ‘लायसेन्स्ड’ - (आँचल चावला) द्वितीय : द् ओरमा मारम(डॉ मधु मेणाचिन्), तृतीय: ‘कश्मीर की विरासत’ (शिवांश खन्ना) यांनी पटकाविले. तृतीय पारितोषिक विजेता शिवांश खन्ना हा तरुण मुंबईचा असून रा. स्व. संघाचा स्वयंसेवकही आहे. शिवांशला यावेळी मनुभाई मांडविया यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.


दरम्यान, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : ऋजू चौहान (आय अ‍ॅम नॉट सॉरी), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : ‘तांडव’ - दीपक सामंता, कॅम्पस व्यावसायिक श्रेणी : सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : निधी हेगडे - (नान देवरू), सर्वोत्कृष्ट अभिनेता - मानव (चिडी बाझ), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : उत्कर्षा बलराम (नान् देवरू) यांना पारितोषिक मिळाले. डॉक्युमेंटरीज् श्रेणीमध्ये ज्युरींकडून निवडलेल्या विशेष उल्लेखनीय लघुपटांत ‘गुरूजी- अहेड ऑफ टाईम्स’ (सुदीप्तो सेन), ‘नन्ही परियों की उडान’(दीक्षा कोहली), ‘ द प्रिएम्बल’ -(हर्षदा देसाई आणि सागर सुरेजा) यांनाही पारितोषिके मिळाली.


लघुपट श्रेणीमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : संयुक्त रेणुका शहाणे (एक कदम), सेब्रेला सेलस (टॉक टू मी प्रेशस), सर्वोत्कृष्ट अभिनेता : श्रीणी (एदु थेवय्यो), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : सबरीवसन षण्मुगम् (टॉक टू मी प्रेशस)



सर्वोत्कृष्ट लघुपट श्रेणीमध्ये प्रथम : राजीव उपाध्याय (एक कदम), द्वितीय : नीतीश आणि श्रीधर (अनावरणा), तृतीय : आशिष कुमार (कितना पानी)
@@AUTHORINFO_V1@@