‘नमस्ते ट्रम्प’ने अहमदाबाद दुमदुमणार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Feb-2020
Total Views |
trump modi_1  H


अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे आज भारतात आगमन!
अहमदाबाद : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दोन दिवसांचा भारत दौरा आज, सोमवारपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यात होणाऱ्या करारांतून दोन्ही देशांमधील संरक्षण आणि सामरिक संबंध आणखी दृढ होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. ट्रम्प यांच्याबरोबर त्यांची पत्नी मेलेनिया, मुलगी इव्हांका, जावई जेअर्ड कुश्नेर यांच्यासह त्यांच्या सरकारीमधील उच्चपदस्थांचा शिष्टमंडळात समावेश आहे.

या दौऱ्यातून विभागातील महत्त्वाच्या भूराजकीय घडामोडींच्या दृष्टीने, विशेषत: चीनचा लष्करी व आर्थिक प्रभाव वाढत असताना, भारत-अमेरिकेतील संबंधांमध्ये वाढ होत असल्याचा संदेश या दौऱ्यातून जगाला मिळणार आहे. ट्रम्प यांनी मोदी यांच्यामध्ये मंगळवारी होणाऱ्या चर्चेमध्ये व्यापार व गुंतवणूक, संरक्षण, सुरक्षा, दहशतवादविरोधी कारवाई, ऊर्जासुरक्षा, धार्मिक स्वातंत्र्य, अफगाणिस्तानातील तालिबानबरोबरील चर्चा, इंडो-पॅसिफिक विभागातील स्थिती यांवर चर्चा होणार असल्याचे अमेरिका आणि भारताच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.





लोकशाहीची परंपरा आणि धार्मिक स्वातंत्र्य हे दोन्ही मुद्दे दोन्ही देशांसाठी सामाईक असून, ट्रम्प त्यांच्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख करतील. ट्रम्प यांच्या या दौऱ्यामध्ये बौद्धिक संपदा अधिकार, व्यापाराच्या सुविधा आणि अंतर्गत सुरक्षा यांसारख्या मुद्द्यांवर भर देण्यात येणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी गुरुवारी सांगितले होते. याशिवाय, अमेरिकेकडून भारत २४ एमएच-६० रोमिओ हेलिकॉप्टर घेणार आहे; तसेच सहा अपाचे हेलिकॉप्टरच्या करारावरही याच दौऱ्यात सह्या होणार आहे. अमेरिका भारताबरोबरील व्यापारी करारासाठी उत्सुक आहे. भारतातील पोल्ट्री आणि डेअरी बाजारपेठेमध्ये प्रवेश मिळविण्याचा अमेरिकेचे प्रयत्न आहे. त्यावरही या दौऱ्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.




अहमदाबादमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या मोटेरा क्रिकेट स्टेडियममध्ये 'नमस्ते ट्रम्प' हा कार्यक्रम होणार आहे. विमानतळ ते स्टेडियमदरम्यान, ट्रम्प आणि मोदी यांचा रोड शो होणार असून, या मार्गावर २४ व्यासपीठावरून भारताच्या विविधतेचे दर्शन घडविण्यात येणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@