डोनाल्ड ट्रम्प यांचे गुजरातमध्ये आगमन ; दोन्ही नेत्यांचा २२ किमीची रोड शो

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Feb-2020
Total Views |

trump modi_1  H
 
 
अहमदाबाद : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अहमदाबादमध्ये आगमन झाले सोमवारी सकाळी ११.३० ला आगमन झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प यांचा हा पहिला भारत दौरा आहे. ट्रम्प अहमदाबादमध्ये २३० मिनिटे थांबणार आहेत. यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत २२ किमीचा रोड शो करणार आहेत. त्यानंतर मोटेरा स्टेडियमवरील नमस्ते ट्रम्प कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे गेल्या ६१ वर्षामध्ये भारत दौर्या्वर येणारे ७ वे अध्यक्ष आहेत. बराक ओबामा दोन वेळेस भारत दौऱ्यावर आले होते.
 
 
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे एअर फोर्स वन हे विमान अहमदाबादच्या विमानतळावर उतरले. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. त्यांच्यासमवेत फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प, त्यांची मुलगी ईवांका ट्रम्प आणि जावई जेअर्ड कुश्नेर यांचे अहमदाबाद विमानतळावर शंख-ढोल-ताशांसह स्वागत करण्यात आले. अनेक पारंपरिक नृत्य आणि पारंपरिक प्रथेने त्यांचे स्वागत करण्यात आले. पुढे ते साबरमती आश्रमला भेट देण्यास निघाले असून पुढे त्यांचा २२ किमीचा रोड शो असणार आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@