कसा असेल डोनाल्ड ट्रम्प यांचा दौरा ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Feb-2020
Total Views |
Donald Trump Poster _1&nb
 
 


 
अहमदाबाद : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आपल्या एअरफोर्स वन या विमानाद्वारे सोमवार दि. २४ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद विमानतळावर आगमन होणार आहे. आपल्या दोन दिवसीय दौऱ्यात फर्स्ट लेडी मेलानिया, मुलगी इव्हाका आणि जावई जारेद कुशनर हेदेखील सोबत असतील. अहमदाबादमध्ये भव्य स्वागत झाल्यानंतर एका रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर अहमदाबाद येथे जगातील सर्वात मोठे स्टेडीअम असलेल्या 'मोटेरा स्डेटीअम' येथे पोहचतील. यावेळी खास नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.



 
 


 
पाच सुरक्षादलांची कक्षा
 
या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यावेळी पाचस्तरीय सुरक्षा व्यवस्था असणार आहे. पहिल्या स्तरावर अमेरिकन सुरक्षा एजन्सी एफबीआय आणि गुप्तचर संघटनेचे सुरक्षारक्षक उपस्थित असणार आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे एक हजारहून जास्त अधिकारी भारतात पोहोचले आहेत. दुसऱ्या स्तरावर राष्ट्रीय सुरक्षा दल (एनएसजी), निमलष्करी दल, दिल्ली पोलीस आदी सुरक्षा तैनात केली जाणार आहे. गेले काही दिवस या सर्व दलांची बैठक सुरू असून सुरक्षा व्यवस्थेचा आढावाही घेण्यात येत आहे. अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आहेत. गुप्तचर यंत्रणांनी सॅटेलाईटद्वारे या भागाचा आढावा घेण्यात येत आहे.
 





 
मोबाईल जॅमरचाही वापर
 
ट्रम्प यांची सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यासाठी ते ज्या-ज्या भागातून जाणार आहेत, त्या ठिकाणी मोबाईल जॅमर बसवण्यात आले आहेत. ट्रम्प ज्या रस्त्यावरून प्रवास करत असतील त्या ठिकाणी मोबाईल सिग्नल बंद करण्यात येणार आहेत. 
 
 






ट्रम्प यांच्यासाठी हॉटेल केले खाली
 
 
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प २४ फेब्रुवारी रोजी आपले विशेष विमान एअरफोर्स वनद्वारे २४ फेब्रुवारीला विमानतळावर उतरतील. मोर्या शेरेटन हॉटेलमध्ये ते थांबवणार आहेत. त्यांची सर्व व्यवस्था याच हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हे हॉटेल खाली करण्यात आले आहे. ट्रम्प जोपर्यंत या हॉटेलमध्ये थांबतील तोपर्यंत कुणालाही इथे प्रवेश दिला जाणार नाही. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी अशी हॉटेल खाली करण्याची ही पहिलीच वेळ आहे.






 
 
तीन तासांपूर्वी यावे लागणार विमानतळावर






 
ट्रम्प दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विमान प्रवास करणाऱ्यांसाठी विमान प्रवास करणाऱ्यांसाठी विमानतळ अधिकाऱ्यांनी एक फर्मान काढले आहे. विमान उड्डाणापूर्वी तीन तास आधी उपस्थित राहावे लागणार आहे.
 



 
 
 
बाहुबली ट्रम्प
 
 
आपल्या भारत दौऱ्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत त्यांचा एक बाहुबली चित्रपटातील मॉर्फ व्हीडिओ शेअर केला आहे. यात बाहुबली ट्रम्प दाखवण्यात आले आहेत.

 


 
 
आग्र्यात ट्रम्प आगमनाची उत्सुकता
 
 
ट्रम्प यांच्या आगमनाची आग्रा येथे जोरदार तयारी सुरू असणार आहे. चौकाचौकात स्वागतासाठी मोठमोठे फलक झळकत आहेत. सोमवारी सायंकाळी ट्रम्प आग्रा येथे असणार आहेत. आग्र्यापासून १३ किमी दूरवर असलेल्या विमानपर्यंत ट्रम्प यांच्या प्रवासात भव्य बॅनर उभारण्यात येणार आहेत. तसेच अनेक कलाकार आपली कला या दरम्यान ट्रम्प यांच्या स्वागतासाठी सादर करतील.




 
 
 

२५ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती भवनात
 
 
आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ट्रम्प यांचे राष्ट्रपती भवनात औपचारीक स्वागत केले जाईल. यानंतर महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळावर श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी राजघाट येथे पोहोचणार आहेत.
 



 
@@AUTHORINFO_V1@@