मराठा तरुणांच्या नियुक्तीचा प्रश्न अधिवेशनात गाजणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Feb-2020
Total Views |
Devendra-Fadanvis-Meet-Ma
 
मुंबई : मराठा समाजाच्या तरुणांना न्याय देण्यात आलेले अपयश ही सरकारची उदासीनता आहे. हे सरकार असंवेदनशील आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या तरुणांना न्याय मिळवून देण्याकरीता आम्ही विधीमंडळाच्या सभागृहात आक्रमक भूमिका मांडू, असे स्पष्ट प्रतिपादन विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केले.
 
 
 
गेल्या २७ दिवसांपासून मराठा समाजाच्या तरुणांचे त्यांच्या न्याय मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. त्यांची रविवारी (२३ फेब्रुवारी) देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि नितेश राणे यांनी भेट घेतली. यावेळी प्रविण दरेकर यांनी मराठा समाजाच्या तरुणांच्या आंदोलनाच्या मागील भूमिका समजवून सांगितली. २७ दिवस होऊनही अद्यापही सरकारला या विषयाचे गांभीर्य नसल्याची टीका दरेकर यांनी केली.
 
 
 
फडणवीस म्हणाले, "मराठा समाजाच्या तरुणांना कायद्यातील तरतुदीनुसार नियुक्त्या मिळाल्या पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा विधिमंडळाने एकमताने समंत केला होता. न्यायालयाने अद्यापही हा कायदा अमान्य केलेला नाही. त्यामुळे या कायद्यातील तरतुदीनुसार उपोषणाला बसलेल्या मराठा समाजाच्या उमेदवारांना नियुक्ती मिळाल्या पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा विधिमंडळाने समंत केला त्या प्रक्रियेमध्ये आपण स्वत: होतो. त्यामुळे या कायद्यातील कुठल्याही तरतुदी रद्द केल्या नाहीत. त्या तरतुदीप्रमाणे सरकारने कायर्वाही करणे आवश्यक आहे."
 
 
 
"हा कायदा उच्च न्यायालयाने वैध ठरविला आहे आणि सर्वोच्च न्यायालयनेही या कायद्यातील तरतुदींना कोणतीही स्थगिती दिलेली नाही, त्यामुळे मराठा समाजाच्या तरुण-तरुणींचा हा प्रश्न सोडविला जाऊ शकतो, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाच्या तरुणांना न्याय न देता महाआघाडी सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडल्याची परिस्थिती आहे. परंतु या समाजाच्या तरुणांना न्याय देण्यासाठी मी विधान सभेत आणि प्रविण दरेकर विधान परिषदेत हा विषय लावून धरू. तसेच या विषयामध्ये सरकारला आमच्या मदतीची आवश्यकता असेल, तर आम्ही मदत करावयाला तयार आहोत. हा कोणत्या एका पक्षाचा विषय नाही, पण तरीही सरकार या प्रश्नावर उदासीन असल्याची बाब निश्चितच दुर्देवी आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
 
 

आंदोलकाची तब्येत खालावली
 
 
दरम्यान २७ दिवस आंदोलन करूनही सरकारकडून झालेल्या दुर्लक्षामुळे एका आंदोकाची तब्येत खालावली असून त्याला उपचारासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


@@AUTHORINFO_V1@@