मुंबईकरांनो यंदा पुन्हा 'तुंबई' पाहण्यासाठी सज्ज व्हा !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Feb-2020
Total Views |
BEST BUS _1  H

हिंदमाता, लोअर परळ, महालक्ष्मी, अंधेरी येथील समस्या कायम

मुंबई : यंदाच्या पावसाळ्यापूर्वी ४५ ठिकाणे पूरमुक्त केली जाणार असली, तरी २४ ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता कायम आहे. अतिवृष्टीत मुंबईला पूरमुक्त करण्याच्यादृष्टीने पालिकेने नियोजन करून कामे हाती घेतली आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये २७३ ठिकाणांमधील २०४ ठिकाणे पूरमुक्त केली आहेत. त्यात यंदाच्या पावसाळ्यापूर्वी अधिक ४५ ठिकाणे पूरमुक्त केली जाणार आहे. मात्र, उर्वरित २४ ठिकाणांची कामे पुढील एक - दीड वर्षांत पूर्ण होणे कठीण असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

त्यामुळे यंदाही त्या ठिकाणी पाणी तुंबण्याच्या समस्येला मुंबईकरांना सामोरे जावे लागणार आहे. मुंबईत थोड्या पावसांतही अनेक ठिकाणी रहिवाशांना पाणी तुंबण्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. पाणी तुंबण्याच्या या दरवर्षीच्या कटकटीतून मुंबईकरांची सुटका करण्याच्यादृष्टीने पावले उचलली आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये पाणी साचणार्यास २७३ ठिकाणांमधील २०४ ठिकाणे कमी झाली असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. यंदा पावसाळ्याआधी ४५ ठिकाणे पूरमुक्त करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहेत. मात्र हिंदमाता, लोअर परळ, महालक्ष्मी, अंधेरी, वरळी, दादर टीटी, परळ आदी महत्त्वाच्या २४ ठिकाणांची कामे पुढील एक ते दीड वर्षात पूर्ण होणे अशक्य आहे.

मुंबईत तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून पम्पिंग स्टेशन बांधण्यात आले आहे. मुसळधार पावसात तुंबणारे पाणी या पम्पिंग स्टेशनद्वारे खेचले जाऊन पाण्याचा निचरा होतो. त्यामुळे मागील काही वर्षांच्या तुलनेत आता येथे पाणी साचून राहत नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. दरम्यान, मुंबईला पूरमुक्त करण्यासाठी अंधेरीत मोगरा आणि माहुल येथे पम्पिंग स्टेशन सुरू करण्यासाठी निविदाही मागवण्यात आल्या आहेत. यासाठी १५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईतील सर्वात महत्त्वाच्या मिठी नदीच्या सुशोभीकरणाच्या कामांतर्गत प्रस्तावित उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यात मुंबईकरांना पाणी साचण्याच्या समस्येतून दिलासा मिळणार आहे. मात्र, यंदा २४ ठिकाणांचे काम पूर्ण होणार नसल्याने तेथे पाणी साचण्याची कटकट यंदाही कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


पूरमुक्तीसाठी उपाययोजना


नदी, नाले, खाडी, समुद्राच्या पातमुखांवर गेट पंप बसवण्यात येणार आहेत. शिवाय नाल्यांमध्येच गेट पंप बसवण्याबाबत नियोजन सुरू असून यामुळे तिवर तोडण्याची आणि पम्पिंग स्टेशनसाठी जागेचीही गरज भासणार नाही. समुद्रात जाणारा कचरा रोखण्यासाठी ईर्ला, लव्हग्रोव्हसारख्या मोठ्या नाल्यांवर 'बॅक रेक स्क्रिन्स' बसवण्यात येणार आहेत. पाण्याच्या निचर्या,साठी निचर्याच्या ठिकाणी 'फ्लड गेट' बसवणार. रेल्वे मार्गावरच्या मोर्यांसमधील गाळ काढण्यासाठी 'हायड्रोझूम कॅमेरा' आणि 'रिमोट कंट्रोल्ड स्विंगलोडर' मशीनची खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी २.६८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

@@AUTHORINFO_V1@@