वारीस पठाणांचे ‘त्या’ हिंदुविरोधी वक्तव्यावरून घुमजाव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Feb-2020
Total Views |


वारीस पठाण पत्रकारपरिषद _




मुंबई
: '१०० कोटी भारतीयांच्या विरोधात नाही तर १५ कोटी मुस्लीम हे १०० लोकांच्या विरोधात आहेत असे मी बोललो होतो', असे म्हणत एमआयएमचे नेते वारीस पठाण यांनी आपल्या हिंदुविरोधी चिथावणीखोर वक्तव्यातून माघार घेतली आहे.


वारीस पठाण म्हणाले
, "माझे वक्तव्य हिंदुविरोधी नसून माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जातो आहे. यातून मला आणि माझ्या पक्षाला बदनाम केले जात आहे. १०० कोटी भारतीयांच्या विरोधात नाही तर १५ कोटी मुस्लीम हे १०० लोकांच्या विरोधात आहेत असे मी बोललो होतो. ते १०० लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा यांच्यातले आहेत. काही पत्रकारही आहेत असा आरोप वारीस पठाण यांनी केला. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.


दरम्यान
, वारिस पठाण यांनी १५ फेब्रुवारी रोजी कर्नाटकच्या गुलबर्गामध्ये आयोजित एका जाहीर सभेत बोलताना '१०० कोटी हिंदूंवर १५ कोटी मुस्लीम भारी पडतील' असे विधान केले होते. या विधानानंतर वारीस पठाण यांच्यावर चौफेर टीका होत होती. त्याचप्रमाणे राज्यभरातून पठाण यांच्यावर देशद्रोहाची कारवाई केली जावी अशी मागणी होत होती. मुंबईसह अनेक राज्यांमध्ये वारीस पठाण यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ठिकठिकाणी वारीस पठाण यांच्या विरोधात निदर्शने करत पठाण यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. एआयएमआयएम या पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनीही पठाण यांना पक्षाचा आदेश येईपर्यंत माध्यमांसमोर न बोलण्याची कारवाई केली होती. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेत वारीस पठाण यांनी आपल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले.


आम्ही सर्व धर्मीयांचा आदर करतो असंही वारीस पठाण यांनी म्हटलं आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास जाणीवपूर्वक केला गेला. भाजपाच्या १०० नेत्यांविरोधात मी बोललो होतो. मी देशविरोधी नाही. मी जे काही बोललो त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी ते वक्तव्य मागे घेतो असेही पठाण म्हणाले. या पत्रकार परिषदेत इम्तियाज जलील यांनीही हा प्रश्न संपला आहे.असे सांगत हा वाद मिटवावा असे सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@