लोकमान्यांच्या सेवेची पोचपावती मिळाली : डॉ. सदानंद मोरे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Feb-2020
Total Views |


dr sadanand more_1 &



मुंबई : “लोकमान्य टिळक यांच्या कार्याची स्मृती जपण्यासाठी त्यांच्या नावाने अनेक ठिकाणी वाचनालयांची निर्मिती करण्यात आली आहे. आजघडीला राज्यात अशी काही वाचनालये असून ती आता शंभरी ओलांडण्याच्या मार्गावर आहेत. पार्ल्यातील लोकमान्य सेवा संघाचे वाचनालयही फार पुरातन आणि प्रसिद्ध असून मीदेखील या वाचनालयाचा सदस्य आहे. लोकमान्यांची थोडीफार सेवा केली असेल, तर त्याचीच ही पोचपावती मला मिळाली,” असे प्रतिपादन तत्त्वज्ञ, भाष्यकार, संशोधक आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांनी शुक्रवारी केले.


ते विलेपार्ले (पूर्व) येथील लोकमान्य सेवा संघाच्या सभागृहात आयोजित ‘लोकमान्य ते महात्मा’ या विशेष व्याख्यानमालेत बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. लोकमान्य सेवा संघातील उपस्थित मान्यवर आणि पदाधिकार्‍यांचे आभार मानल्यानंतर ते आपल्या भाषणात ते म्हणाले की, “लोकमान्य सेवा संघाच्या कार्याचे कौतुक करावे तितके कमीच. लोकमान्यांची खर्‍या अर्थाने स्मृती जपण्याचे काम त्यांनी केले असून त्यांचे हे काम वाखाणण्याजोगे आहे.”


ते पुढे म्हणाले की, “मला आठवते की १९८५ साली काँग्रेसच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने महाराष्ट्र सरकारच्यावतीने एक ग्रंथ काढण्याचे काम सुरु करण्यात आले. त्यासाठी मलाही एका विषयावर लिखाण करायचे होते. त्यावेळी केलेल्या अभ्यासाअंती मला लक्षात आले की, महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक यांच्या विचारांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा म्हणजेच ‘श्रीमद्भगवतगीता’ होय,” असे त्यांनी सांगितले. दै. ‘मुंबई तरुण भारत’ आणि ‘महाएमटीबी’ या व्याख्यानमालेचे माध्यम प्रायोजक होते.
@@AUTHORINFO_V1@@