मुंबईनंतर मनसेचा बांगलादेशी घुसखोरांविरोधातील मोर्चा पुण्याकडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Feb-2020
Total Views |

MNS_1  H x W: 0


पुणे :
अवैधरित्या राहणाऱ्या बांग्लादेशी घुसखोरांविरोधात मनसेने मुंबईतून सुरू केलेले आंदोलन आता पुण्याच्या दिशेने वळविण्यात आले आहे. शनिवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील धनकवडी परिसरातील घरोघरी जाऊन नागरिकांचे आयकार्ड चेक केले. मनसेच्या कार्यकर्त्यांसोबत काही पोलिसदेखील होते.



एका व्यक्तीकडे मिळाले दोन आयकार्ड
मनसेचे पुणे शहर प्रमुख अजय शिंदे यांनी सांगितले की, चौकशीदरम्यान एका तरुणाकडे दोन व्होटर आयडी मिळाले. मनसे कार्यकर्त्यांनी त्या व्यकीला पोलिसांच्या स्वाधिन केले आहे. अशाच प्रकारे शहरात अनेक घुसखोर राहत आहेत, त्यांच्याबद्दलही मनसेकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी मनसेकडून पुण्यात बांग्लादेशींविरोधात पोस्टर लावण्यात आले होते. त्यात लिहीले की, 'भारत माझा देश आहे, माझे माझ्या देशावर प्रेम आहे. घुसखोरी करणारे माझे बांधव नाहीत. त्यांना देशातून हकलून लावले पाहीजे.'


@@AUTHORINFO_V1@@