नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ कुडाळवासीयांची भव्य रॅली!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Feb-2020
Total Views |
kudal_1  H x W:





विशाल तिरंग्यासह लक्षवेधी ठरली कुडाळवासीयांची रॅली; ढोलताशांच्या गजरात पालखीतून संविधानाची मिरवणूक 

कुडाळ : केंद्राशासनाने लागू केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा व राष्ट्रीय नागरिकता नोंदणीच्या समर्थनार्थ कुडाळ शहरामध्ये भव्य रॅली आयोजित करण्यात आली होती. कुडाळवासीयांच्या उत्स्फुर्त प्रतिसादात पार पडलेल्या या रॅलीत विशाल तिरंगा लक्ष वेधून घेत होता.


या रॅलीमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, नगराध्यक्ष ओमकार तेली, रणजीत देसाई, भाजपचे तालुकाध्यक्ष गोपाल हरमलकर, मिलिंद देसाई, विवेक पंडित, बंड्या सावंत, अभय शिरसाट, धीरज परब, संध्या तेरसे यांच्यासह हजारो नागरिक सहभागी झाले होते.


कुडाळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून रॅलीला प्रारंभ होऊन गांधी चौक, जिजामाता चौकमार्गे ती तहसील कार्यालयात पोहोचली. सहभागी लोकांच्या हातात नागरिकत्व कायद्याचे समर्थन करणारे फलक होते. यावेळी देशप्रेमी नागरिक मंचाच्या वतीने संपूर्ण देशभर नागरिकत्व कायद्याची विनाविलंब अंमलबजावणी करावी, असे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी ढोलताशांच्या गजरात पालखीतून संविधानाची मिरवणूक काढण्यात आली.



@@AUTHORINFO_V1@@