‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणारी अमुल्या नक्षलवाद्यांशी संबंधित : येडीयुरप्पा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2020
Total Views |

amulya _1  H x



बंगळूरू
: बंगळुरूमध्ये नागरिकता सुधारणा कायद्याच्या (सीएए) विरोधात अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यासमोर अमुल्या या तरुणीने मंचावरुन पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या .या तरुणीवर कठोर कारवाई करण्यात येणार असून कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा म्हणाले  की, अमुल्या ही तरुणी नक्षलवाद्यांशी संबंधित आहे. तिच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.


येडियुरप्पा म्हणाले, “बेंगळुरूमध्ये सीएएविरोधी रॅलीत ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्या अमुल्याला जामीन मिळू नये. तर दुसरीकडे कर्नाटकचे गृहराज्यमंत्री बसवराज बम्मई म्हणाले, 'सीएएविरोधात रॅलीत पाकिस्तान जिंदाबादचा नारा देणारा अमुल्या अशा ठिकाणी वास्तव्यास आहे जेथे नक्षलवादी बर्‍याच दिवसांपासून कार्यरत आहेत. तिने फेसबुकवर बर्‍याच पोस्ट शेअर केल्या आहेत. आम्ही याची देखील चौकशी करू.”


या प्रकरणी बंगळुरूचे पोलिस आयुक्त भास्कर राव यांनीही आपली प्रतिक्रिया नोंदविली आहे. ते म्हणाले, 'घोषणा देणाऱ्या मुलीवर (अमुल्या) आणि इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या आम्ही आयोजकांच्या भूमिकेकडे पाहत आहोत. माननीय खासदार (असदुद्दीन ओवैसी) यांची भूमिका स्पष्ट नाही कारण ते देखील तेथे उपस्थित आमंत्रितापैकी एक व्यक्ती होते.परंतु अजूनही त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.’



अमूल्या कोण आहे?


२० वर्षीय अमूल्या बेंगळुरूच्या एनएमकेआरव्ही महिला महाविद्यालयातून बीए जर्नलिझम शिकत आहे. तिने बंगळुरूमध्ये रेकॉर्डिंग कंपनीत भाषांतरकार म्हणूनही काम केले आहे. तिने मणिपाल येथील सेंट नॉर्बेट सीबीएसई स्कूल आणि क्राइस्ट स्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे. अमुल्या लिओना 'अल्नोरोन्हा' नावाचे स्वतंत्र फेसबुक पेज चालविते.


अमुल्याच्या वडिलांनीही आपल्या मुलीचा केला निषेध 


कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणाले, तिचे  वडील असेच म्हणतात की ते अमूल्याला वाचवणार नाही. याचा अर्थ सरळ असा आहे की तिचा नक्षलवाद्यांशी संपर्क होता. तिला  योग्य शिक्षा द्यावी. 



सोशल मीडियावर सक्रिय


अमूल्या फेसबुकसह सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव आहे. अमुल्याचे superprof.co.in वर अधिकृत खाते आहे, ज्यावर तिने विद्यार्थी असल्याचे सांगितले आहे. अभ्यासाबरोबरच तिला कविता लिहिण्याचीही आवड आहे. याशिवाय तिला अध्यापनातही रस आहे.
@@AUTHORINFO_V1@@