शाहीनबागेतील 'शेरनी' ढेर ! नोकरी गेल्यानंतर सुचलं शहाणपण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2020
Total Views |
Nahid-Zaidi_1  




व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर झाली कारवाई



लखनऊ : उत्तर प्रदेशच्या सहारनपुर येथील शाहीनबागेत जात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि हिंदू समाजाविरोधात गरळ ओकणाऱ्या शिक्षिका नाहिदा जैदी यांना हे प्रकरण चांगलेच महाग पडले आहे. मोदी सरकारने घेतलेल्या कलम ३७०, तिहेरी तलाक आणि सीएए विरोधात वक्तव्य करतानाच हिंदू धर्मीयांविरोधात केलेले वक्तव्य या शिक्षिकेला चांगलेच भोवले आहे. उत्तर प्रदेश सरकारने कारवाई करत या महिलेला नोकरीवरून निलंबित केले आहे. मात्र, या कारवाईनंतर जैदी यांनी आपल्या वक्तव्यावरून सारवासारव करण्यास सुरुवात केली आहे.


 
 
पहिल्या व्हिडिओतील शाहिनबागेतील वक्तव्यानुसार त्या म्हणतात, "हवा आमची आहे, पाणी आमचे आहे, जमीन आमची आहे, त्यामुळे आम्हाला हटवण्याचा प्रयत्न करण्याचा प्रश्नच नाही. तुम्ही एनआरसी कसा लागू करू शकता, मी कित्येक वर्ष राज्यशास्त्र शिकवत आहे, देशाला स्वातंत्र्य कसे मिळाले याबद्दल आम्ही जाणतो. मात्र या स्वातंत्र्याचा फायदा आता मोदी-शाह उठवत आहेत."


 
 
शाहिनबागेतून केलेल्या हुंकारात त्या सांगतात, "अमित शाह आम्हाला घाबरवू पाहत आहेत, मी ज्या ठिकाणी शिकवते तिथेही मला बोलले जाते यासाठी एकता दाखवण्याच्या दृष्टीने आम्ही आज इथे आलो आहोत." आपल्या प्रतिक्रीयेत अयोद्ध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधातही त्यांनी आक्षेप घेतला आहे. हिंदू धर्मीयांविरोधात केलेले वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने कारवाई केली आहे. मात्र, कारवाईनंतर शाहीनबागेतली ही 'शेरनी' काहीशी थंड पडली. हा माझ्याविरोधातील षडयंत्राचा हा भाग असल्याचे त्यांनी आपल्या प्रतिक्रीयेत म्हटले आहे. आपल्या वक्तव्यावरून वादात सापडलेल्या या शिक्षिकेच्या भूमीकेवरून ती विद्यार्थ्यांनाही असेच शिक्षण देत होती का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
 
 
या प्रकरणी या शिक्षिकेच्या शाळेतील मुख्याध्यापकांचेही म्हणणे स्पष्ट झाले आहे. जैदी यांनी म्हटल्यानुसार, त्या एकट्याच या शाळेत मुस्लीम शिक्षिका नाहीत. तसेच इतर शिक्षिकांकडून कुठलाही त्रास त्यांना होत असल्याची तक्रारही कधी आली नसल्याचे म्हटले आहे. तसेच शहरातील पोलीसांनी कुठलीही संघटना आंदोलनात सहभागी होण्यासाठी कुठल्याही शाळेत किंवा संस्थेत जाऊन आंदोलनात सहभागी होण्यास जबरदस्ती करत असेल, अशांवर कारवाई करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
@@AUTHORINFO_V1@@