उत्तरप्रदेशमध्ये सापडल्या सोन्याच्या खाणी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2020
Total Views |
gold mine_1  H




वैज्ञानिकांच्या ४० वर्षांच्या मेहनतीला अखेर यश
लखनऊ : उत्तर प्रदेशच्या सोनभद्र भागात सोन्याची खाण सापडल्याची माहिती समोर येत आहे. पडरक्ष गावच्या डोंगराळ भागात सोन्याची खाण असल्याची पुष्टी खाण अधिकाऱ्यांनी केली आहे. खाणीत सोन्याचे दगड मिळू शकतात. खनिज अधिकारी विजय कुमार यांच्या नेतृत्वात ९ जणांची टीमने गुरुवारी डोंगराळ भागाची पाहणी केली आहे.


खनिज संपदेसाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या उत्तर प्रदेशमधील सोनभद्र जिल्हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. सोन्याचा खाण सापडल्याची माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण जगात हे शहर अधोरेखित झाले आहे. याचा शोध घेण्यासाठी वैज्ञानिकांच्या चमूला ४० वर्षे लागली.


सोनभद्र येथे १९८० मध्ये सोन्याची खाण असल्याचे समोर आले होते. ज्या भागात सोन्याचे दगड सापडले आहेत त्या भागाची पाहणी सुरु असून, संबंधित भूमीच्या सीमा ठरवल्यानंतर ई टेंडरिंगची प्रक्रिया सुरु होईल. सोनेच नाही तर इतर खनिज संपत्ती देखील येथे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. १५ दिवसांपासून येथे हवाई सर्वेक्षण देखील सुरु आहे. येथे यूरेनियम असण्याची देखील शक्यता आहे.
@@AUTHORINFO_V1@@