कमलनाथ सरकारचा नसबंदीचा आदेश काँग्रेसची अघोषित आणीबाणीच : डॉ.संबित पात्रा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2020
Total Views |

kamalnath _1  H



नवी दिल्ली :
मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारने नसबंदीबाबत नवीन फर्मान जारी केला आहे. राज्य सरकारने आरोग्य कर्मचाऱ्यांना नसबंदीसाठी लक्ष्य दिले आहे. प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्यांना दरमहा ५ ते १० पुरुषांची नसबंदी करणे सरकारने बंधनकारक केले आहे. यावर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी जोरदार हल्ला चढवत, कमलनाथ सरकारचे हे फर्मान म्हणजे इंदिरा गांधींच्या कॉंग्रेसप्रणित आणीबाणीचा काळ आठवून देणारे आहे, अशी टीका त्यांनी कमलनाथ यांच्यावर केली.


ते पुढे म्हणतात, “आपणास आणीबाणीचा काळ माहिती आहे. तेव्हाची कॉंग्रेस सरकारची आणीबाणीच्या काळातील नसबंदीची धोरणे अशाच प्रकारची होती. कमलनाथ हे कॉंग्रेसचे अनुभवी नेते आहेत, त्यामुळे ते अशाप्रकारचे निर्णय घेत आहेत. कॉंग्रेसशासित सर्व राज्यांची आज हीच स्थिती आहे.”


मध्य प्रदेशात अघोषित आणीबाणी आहे : शिवराजसिंह चौहान


मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही कमलनाथ सरकारच्या या निर्णयाला आणीबाणी २ म्हटले आहे. ते म्हणतात, “मध्य प्रदेशात अघोषित आणीबाणी आहे. हा कॉंग्रेसचा आणीबाणी भाग-२ आहे ? एमपीएचडब्ल्यूचे काम करण्यात कमी असल्यास सरकारने कारवाई केली पाहिजे, पण लक्ष्य साध्य न केल्यास पगार रोखून निवृत्त करण्याचा निर्णय हुकूमशाही आहे.”


मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारने पुरुष बहुद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी नवा अद्यादेश जारी केला आहे. २०१९-२० या वर्षात जर कमीत कमी एकाची नसबंधी करण्यात अपयश आल्यास त्यांच वेतन कपात केले जाईल, असा आदेश कमलनाथ सरकारने जारी केला आहे. राष्ट्रीय कुटुंब नियोजनाचा सर्वेक्षण अहवाल पुढे करत राष्ट्रीय आरोग्य मिशन (एनएचएम)ने जिल्हाधिकारी, मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकाऱ्यांना झिरो वर्क आऊटपूट देणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याचे आदेश दिलेत. काम नाही, तर पगारही नाही, या तत्तावर काम करावे, असे आदेश देण्यात आले आहेत. सोबतच पुरुष कर्मचाऱ्यांना कुटुंब नियोजन कार्यक्रमांतर्गत नसबंदीसाठी लक्ष्य देण्यात यावे, असेही यामध्ये म्हंटले आहे.
@@AUTHORINFO_V1@@