महाराष्ट्राच्या सुवर्णपदक विजेत्या बॉक्सरची आत्महत्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2020
Total Views |

प्रणव राऊत _1  


अकोला : महाराष्ट्राचा सुवर्णपदक विजेता बॉक्सर प्रणव राऊत याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रणवने अकोल्यातील शास्त्री स्टेडियम जवळच्या क्रीडा प्रबोधनीत आत्महत्या केली. याठिकाणी तो रोज सराव करायचा. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. जानेवारी महिन्यात दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रणवला सुवर्णपदक मिळाले होते. या प्रकारामुळे संपूर्ण अकोल्यासह क्रीडा जगतात शोककळा पसरली आहे.


आज सकाळी साडे नऊच्या सुमारस प्रणव रुम मधूनबाहेर आला नाही म्हणून त्याच्या मित्रांनी दरवाजा ठोठावला. अनेक वेळा आवाज देऊन देखील तो दरवाजा उघडत नसल्याने मित्रांनी दरवाजा तोडला. तेव्हा प्रणवने गळफास घेतल्याचे आढळून आले. घटना कळताच काही वेळाने क्रीडा प्रमुख अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रणवने यापूर्वीही महाराष्ट्रासाठी अनेक सुवर्णपदके जिंकली आहेत,मात्र त्यानं अचानक उचलेल्या या पावलामुळे त्याच्या प्रशिक्षकांना मोठा धक्का बसला आहे.

क्रीडा प्रमुखांनी रामदास पेठ पोलिसांना माहिती दिली. दरम्यान त्याच्या मित्रांनी आणि प्रशिक्षकांनी प्रणव आदल्या दिवशी सराव करत असल्याचेही सांगितले. प्रणव कालपर्यंत ठिक होता. त्याच्या वागण्यातून किंवा बोलण्यातून तो कोणत्याही तणावात किंवा दबावात नसल्याचेही त्यांनी सांगितले. वयाच्या २२व्या वर्षी प्रणवने अचानक टोकाचे पाऊल का उचलले याचा सर्वांना धक्का बसला आहे. या प्रकरणी पोलिस तपास करत आहेत. प्रणवच्या आत्महत्येमुळे अकोला आणि महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
@@AUTHORINFO_V1@@