राज्यपालांचा महाविकास आघडीला पुन्हा एकदा दणका!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2020
Total Views |
mahavikasaaghadi_1 &





सरपंच निवडीच्या अध्यादेशावर स्वाक्षरी करण्यास दिला नकार
मुंबई : फडणवीस सरकारचे एकामागोमाग एक निर्णय बदलण्याचा सपाटा लावलेल्या महाविकास आघाडी सरकारला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा धक्का दिला आहे. ग्रामपंचायत सदस्यांच्या मार्फत सरपंच निवडीचा नवा निर्णय तात्काळ लागू करण्यासाठी सरकारने केलेली अध्यादेशाची शिफारस राज्यपालांनी फेटाळून लावली आहे.


राज्यात भाजपचे सरकार असताना नगराध्यक्ष आणि सरपंचांची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा फायदा भाजपला झाला होता. मात्र, या निवड प्रक्रियेमुळे सरपंच एका विचारांचा आणि सदस्य इतर विचारांचे निवडून येत असल्यामुळे त्याचा परिणाम विकास कामांवर होत असल्याचा आक्षेप काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतला होता. जनतेतून सरपंच म्हणून थेट निवडून आलेली व्यक्ती सर्व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाही, अशा तक्रारी आहेत. या सर्वांचा विकासकामांवर परिणाम होतो. जनतेतून होणारी थेट सरपंच निवडणूक रद्द करावी, अशी विधीमंडळाच्या अनेक सदस्यांनी मागणी केली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील सरपंचपदाची थेट निवडणूक रद्द करण्याबाबत सूतोवाच केले होते.


नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाने फडणवीस सरकारचा हा निर्णय रद्दबातल ठरवला होता. तो तात्काळ प्रभावाने लागू व्हावा यासाठी अध्यादेश काढण्याची शिफारस आघाडी सरकारने राज्यपालांकडे केली होती. मात्र, ही शिफारस राज्यपालांनी फेटाळली आहे. त्यामुळे नवा निर्णय राबवण्यासाठी आता सरकारला आगामी अधिवेशनाची वाट पाहावी लागणार आहे. विधानसभेत विधेयक आणून हा निर्णय सरकारला लागू करता येईल.
@@AUTHORINFO_V1@@