काफला : गुलामीचा काळा कायदा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2020   
Total Views |

ABOLISH-KAFA_1  

 


आज सौदी अरेबिया आणि 'गल्फ कॉर्पोरेशन कौन्सिल'चे सदस्य असलेले देश आपल्या धनसंपत्तीच्या बळावर गरीब परदेशी कामगारांना गुलामच करत आहेत. त्या गुलामीची नकारात्मक ओळख आणि व्याप्ती पैशाच्या जोरावर दडपली गेली आहे. मात्र, सत्य एकच आहे की, काफला एक गुलामीच आहे.

 

जेव्हा केव्हा 'काफला' कायद्याचा आणि सौदी अरेबियातील परदेशी कामगारांचा उल्लेख येतो, त्यावेळी मूळची इंडोनेशियन असलेली आणि कामानिमित्त आपल्या लहानग्या मुलासोबत सौदी अरेबियामध्ये गेलेली तुती तुरसीलवती आठवते. तुती २००९ साली सौदीमध्ये कामासाठी गेली. २०१० साली कामाच्या ठिकाणच्या वरिष्ठाने सूद मल्लाक अल अल उतेबीने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. इज्जत आणि जीव वाचवण्यासाठी तिनेे त्याला प्रतिकार केला. त्या प्रतिकारामध्ये उतेबी जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. खरे तर तुतीचे शौर्य आणि हिम्मत वाखाणण्यासारखीच. आपल्या देशात तर तिला शौर्य पुरस्काराने सन्मानित केले असते. पण, सौदीमध्ये तिला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.

२०१८ साली तिला फासावर लटकवलेही गेले. याबाबत इंडोनेशियामधील तिच्या कुटुंबाला, इंडोनेशियन सरकारला कळवण्याची तसदीही सौदी सरकारने घेतली नाही. तुतीबद्दल वाईट वाटते. पण, तिचे दुर्दैव इतकेच नाही, तुतीच्या म्हणण्यानुसार बलात्कारापासून वाचण्यासाठी तिने उतेबीवर हल्ला केला होता. त्या गुन्ह्याची शिक्षा देण्यासाठी तिला पकडण्यात आले. त्यानंतरही नऊ जणांनी तिच्यावर बलात्कार केला. भयानक. खरे म्हणजे फासावर जाण्याआधी तुती तेव्हाच मेली असेल. तुतीसुद्धा 'काफला' कायद्यानेच तिथे कामावर रूजू झाली होती. ती परकीय कामगार होती. तिच्यावर सौदीच्या स्थानिक मालकाचा अधिकार होता. तिला कसलेच स्वातंत्र्य नव्हते. तुतीच्या मृत्यूने 'काफला' कायदा आणि सौदीमधील परदेशी कामगारांचे जगणे पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर आले.

 

या पार्श्वभूमीवर आजसुद्धा सौदी अरेबियामध्ये काय परिस्थिती आहे? जगभरच्या मुस्लिमांना तर वाटते की 'मुस्लीम ब्रदरहूड' संकल्पनेअंतर्गत श्रीमंत सौदी अरेबिया पायघड्या घालूनच आपले स्वागत करेल. कारण हेच, मुस्लीम देश, शरिया आणि कुराण. आपल्या धर्मबांधवांचा देश म्हणून तिथे जगताना, काम करताना अडचण येणार नाही. तिथे जाऊन खूप पैसे कमवू, असेच बहुतेकांचे स्वप्न. थोडक्यात सौदी म्हटले की, पैसाच पैसा असे खूळ काहींच्या डोक्यात पक्के बसलेले. पैशाने लोक विकले जातात म्हणून सौदीतल्या बहुसंख्य श्रीमंत अरबांचे डोकेही सैतानीच झालेले. परक्या देशातून लोक कामाला येतात. त्यांचे इथे ओळखीचे-पाळखीचे कोणी नसते, कुणाची साथ नाही, कुणाची मदत नाही. केवळ आणि केवळ पैसे मिळवण्यासाठी म्हणून येणारे कामगार आपले गुलामच आहेत, असे त्यांना वाटत असते. ज्याच्याकडे काम करतो तो मालक जे सांगेल ते काम मुकाट करायचे.

कोणत्याही परिस्थितीत कामापासून सुटका नाही
. मालकाची मर्जी आणि लहर सांभाळत जगावे लागते. या अशा परिस्थितीमध्ये महिला कामगारांची दुर्दशा तर विचारायला नको. पण, पैशासाठी आणि मुख्यतः सुटका नाही म्हणून कामगारांना हे सगळे सहन करावे लागते. मानवी हक्क, कायद्यांचे इथे अस्तित्वच आहे की नाही, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती. या परिस्थितीला कारणीभूत आहे तो 'काफला' कायदा. हा कायदा सौदी अरेबियामध्ये कामाला येणाार्‍या परदेशी कामगार मजुरांसाठी आहे. गल्फ कॉर्पोरेशन कौन्सिलचे सदस्य असलेले देश बहरीन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, जॉर्डन आणि लेबनॉन या ठिकाणी १९५० साली जगभरातून आलेल्या मजुरांसाठी 'काफला' कायदा अस्तित्वात आहे.

 

या कायद्यानुसार वर नमूद केलेल्या देशामध्ये परदेशातील कामगार त्यांच्या स्थानिक मालकाच्या परवानगीशिवाय दुसर्‍या नव्या ठिकाणी कामाला जाऊ शकत नाही. परदेशी कामगारांना गुलाम बनवणारा हा काळा कायदा. तो कदाचित आज ना उद्या कागदपत्रांतून काढूनही टाकला जाईल. पण, स्वार्थी कायदा बनवून धनसंपत्तीच्या जोरावर आपण कुणालाही गुलाम बनवू शकतो, ही वृत्ती जोपर्यंत मरत नाही, तोपर्यंत जगभरात गुलामी राहणारच ! आज सौदी अरेबिया आणि 'गल्फ कॉर्पोरेशन कौन्सिल'चे सदस्य असलेले देश आपल्या धनसंपत्तीच्या बळावर गरीब परदेशी कामगारांना गुलामच करत आहेत. त्या गुलामीची नकारात्मक ओळख आणि व्याप्ती पैशाच्या जोरावर दडपली गेली आहे. मात्र, सत्य एकच आहे की, काफला एक गुलामीच आहे.

 
@@AUTHORINFO_V1@@