उद्धव ठाकरे घेणार मोठ्या भावाची भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Feb-2020
Total Views |

Uddhav-Thackeray_1 &

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींच्या भेटीला

 
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, भेटीचे कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यांच्या भेटीवरून आता वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, या भेटीदरम्यान राज्याच्या तिजोरीतील खडखडाड आणि शेतकरी कर्जमाफी या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी शपथविधीपूर्वी ठाकरे यांनी मी मोठ्या भावाला भेटण्यासाठी दिल्लीत जाणार असल्याचे म्हटले होते. मात्र, शपथविधीला पंतप्रधान मोदी उपस्थित राहीले नाहीत.
 
 
उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीकडे राजकीय वर्तूळाचे लक्ष लागले आहे. यापूर्वी पंतप्रधान मोदी पुण्याच्या दौऱ्यावर आले असताना विमानतळावर स्वागतासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः गेले होते.
 
 
विधानसभा निवडणूकीपूर्वी भाजपसोबत प्रचार करणाऱ्या शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. यानंतर भाजप आणि शिवसेनेतील कटूता वाढू लागली. मात्र, उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधुत्वाचे नाते गेली पाच वर्षे महाराष्ट्राने पाहिले आहे. याचा फायदा राजकीय कौशल्य वापरून उद्धव ठाकरे महाराष्ट्राला केंद्रातून मदत मिळवून देतील का ?, तसेच उद्या कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होईल याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.
 


 
@@AUTHORINFO_V1@@