प्रभू श्रीरामांच्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडविणार 'श्री रामायण एक्सप्रेस'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Feb-2020
Total Views |

shri ramayan express_1&nb




नवी दिल्ली
: प्रभू श्रीराम भक्तांसाठी भारतीय रेल्वे एक विशेष रेल्वे सुरू करणार आहे. ज्याची थीम रामायणवर आधारित आहे. ही 'श्री रामायण एक्सप्रेस' सेवा भगवान श्रीरामशी संबंधित तीर्थक्षेत्रांना जोडेल. या ट्रेनमधील प्रवासादरम्यान आपल्याला प्रभू श्रीरामाच्या भजन-कीर्तनाचा आनंद घेता येईल. श्री रामायण एक्स्प्रेसमध्ये भजन-कीर्तनाच्या ऑडिओ व व्हिडिओची व्यवस्था करण्यात आली आहे.
भगवान रामशी संबंधित तीर्थक्षेत्रांवर प्रवास करणाऱ्या या विशेष रेल्वेला 'रामायण एक्सप्रेस' असे नाव दिले आहे. आयआरसीटीसीकडून मिळालेल्या माहितीनुसार, रामायण एक्सप्रेस होळीनंतर म्हणजे २८ मार्च रोजी सुरू होईल. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही.के.यादव यांनी या रेल्वेबद्दल माहिती देताना म्हणाले की, प्रवासादरम्यान यात्रेचा अनुभव घेता यावा यासाठी या ट्रेनची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे. ट्रेनमध्ये भजन-कीर्तनाचे ऑडिओ व व्हिडिओ व्यवस्था करण्यात आली आहे.


या ट्रेनमध्ये नंदीग्राम, सीतामढी, जनकपूर, वाराणसी, प्रयाग, श्रृंगपूर, चित्रकूट, नाशिक, हंपी आणि रामेश्वरम या रामायण सर्किटच्या महत्वाच्या जागांचा समावेश असेल. तथापि, या ट्रेनच्या वेळापत्रकानुसार अद्याप माहिती नाही. ही ट्रेन १६ रात्री -१७ दिवस प्रवास करेल. आयआरसीटीसीने सांगितले की, रामायण एक्सप्रेसमध्ये १० डबे असतील. त्यापैकी पाच स्लीपर गैर वातानुकूलित आणि पाच वातानुकूलित थ्री टीयर असतील. दिल्लीहून सफदरजंग, गाझियाबाद, मुरादाबाद, बरेली आणि लखनऊ या ट्रेनमध्ये चढू शकता. प्रथम येणा-या प्रथम प्राधान्य या तत्वावर त्या ट्रेनमध्ये बुकिंग केले जाईल.


या तीर्थक्षेत्रांचा समावेश
'श्री रामायण एक्सप्रेस' अयोध्यातील रामजन्मभूमी आणि हनुमान गढी, नंदीग्राममधील भारत मंदिर, सीतामढी (बिहार) मधील सीता माता मंदिर, जनकपूर (नेपाळ), वाराणसीतील तुलसी मानस मंदिर आणि सीतामढी (यूपी) मधील संकट मोचन मंदिर येथे जाईल. सीतामढी स्थळ, प्रयागमधील त्रिवेणी संगम, हनुमान मंदिर आणि भारद्वाज आश्रम, श्रींगवरपूरमधील श्रृंगी ऋषी मंदिर, रामघाट आणि चित्रकूटमधील सती अनुसुइया मंदिर, नासी पंचवटी, हंपी मध्ये ज्योतिर्लिंगांपैकी शिवमंदिर अंजनाद्री हिल आणि रामेश्वरम यांचा समावेश आहे.


इतके पैसे मोजावे लागणार


जर आपण रामायण युग अनुभवण्यास तयार असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती १६ ,०६५ रुपये स्लीपर क्लास पॅकेजचा पर्याय मिळेल. त्याच वेळी, वातानुकूलित श्रेणीसाठी प्रति व्यक्ती २६ ,७७५ रुपये द्यावे लागतील.
@@AUTHORINFO_V1@@