माझ्या मागच्या षडयंत्रामागे कोण ते योग्यवेळी बाहेर येईल : फडणवीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Feb-2020
Total Views |
Devendra-Fadanvis_1 

 
 
 
नागपूर : माझ्या मागच्या षडयंत्रामागे कोण आहे ते योग्यवेळी बाहेर येईल, असा इशारा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. नागपूरच्या दिवाणी न्यायालयाने निवडणूक शपथपत्रातील माहिती लपवल्या प्रकरणी त्यांना दिलासा दिला आहे. यानंतर प्रतिक्रीया देताना ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. न्यायालयाने फडणवीस यांना १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
 
 
 
दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातून सन २०१४ ची विधानसभा निवडणूक लढवताना उमेदवारी अर्जासोबत केलेल्या प्रतिज्ञापत्रात प्रलंबित फौजदारी खटल्यांची पूर्ण माहिती न दिल्याबद्दल लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम १२५ ए अन्वये खटला चालवण्याच्या गेल्या वर्षी दिलेल्या निकालाचा फेरविचार करावा यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी निकाल राखून ठेवला होता. यावर गुरुवारी सुनावणी झाली.
 
 
यानंतर प्रतिक्रीया देताना फडणवीस म्हणाले, "जन आंदोलन करताना १९९५ ते ९७ दरम्यानच्या झोपडपट्टी हटाव मोहिमेला विरोध करताना दाखल झालेल्या गुन्हांची माहिती निवडणूक लढवताना शपथपत्रात दाखल केली नाही. या प्रकरणी माझ्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. कनिष्ठ न्यायालयाने समन्स दिल्यानंतर आज न्यायालयात हजर राहावे लागले होते. यातील गुन्हे हे जनआंदोलन करताना दाखल झालेले आहेत. यामागे कोण आहे याचा योग्यवेळी खुलासा करू, प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्या कारणाने यावर भाष्य करणे योग्य नाही. तसेच हे खटले लपवण्या मागे कुठलाही उद्देश नव्हता. कारण ही प्रकरणे तशी नव्हतीच, जनसंघर्ष करत असताना असे खटले दाखल होतात माझ्या वैयक्तिक स्वरुपाचा कुठलाही खटला माझ्यावर दाखल नाही."





@@AUTHORINFO_V1@@