दहशतवादाच्या मुद्द्यावर चीनची भारताला साथ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Feb-2020
Total Views |


china with india_1 &



नवी दिल्ली
: पाकिस्तान
चे मित्रदेश चीन आणि सौदी अरेबिया यांनीही दहशतवादाविरूद्ध कठोर कारवाई न करणाऱ्या पाकिस्तानची साथ सोडली आहे. पॅरिस येथे सुरू असलेल्या फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ)च्या बैठकीत चीन, भारत, अमेरिका, युरोपियन देश आणि सौदी अरेबिया इत्यादी देश सामील झाले. या सर्व देशांनी पाकिस्तानची कान उघडणी केली आहे. मनी लाँड्रिंग आणि दहशतवादाला आर्थिक रसद पुरवणाऱ्यांविरोधात पाकिस्तानने ठोस कारवाई करावी, तसेच दहशतवादी संघटनेच्या सर्व म्होऱ्हक्यांवर कठोर कारवाई करून त्यांना कायदेशीर कक्षेत आणावे.


राजनयिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
केवळ तुर्की हाच देश आहे असा आहे जो पाकिस्तानची पाठराखण करत आहे. केवळ तुर्कीने पाकिस्तानला ग्रे यादीतून वगळण्याची मागणी केली. चीनने मात्र यावेळेस भारताची साथ दिली आहे. चीनचा हा निर्णय भारतासाठी महत्वपूर्ण आहे कारण चीनने एफएटीएफमध्ये पाकिस्तानला नेहमीच पाठिंबा दर्शविला होता. परंतु, आता हे स्पष्ट झाले आहे की पाकिस्तान एफएटीएफ ग्रे यादीमध्ये राहील आणि यावर्षी जूनपर्यंत पुरेशी पावले उचलली नाहीत तर त्याचे परिणाम भोगावे लागतील. याची गुरुवारी याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल.


गेल्या वर्षी महाबलीपुरममध्ये झालेल्या दुसर्‍या अनौपचारिक बैठकीनंतर
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना दहशतवादाबद्दल चिंता असल्याचे सांगितले.



जूनमध्ये आढावा घेतला जाईल

आता एफएटीएफची पुढील बैठक जूनमध्ये होणार आहे. ज्यामध्ये दहशतवादी वित्तपुरवठा, मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादी नेत्यांविरूद्ध केलेल्या कारवाईचा सखोल आढावा पाकिस्तानकडून घेण्यात येणार आहे. चार महिन्यांत पाकिस्तान एफएटीएफच्या मागणीची पूर्तता करण्यात अक्षम ठरल्यास त्यास काळ्या यादीत टाकले जाईल.

@@AUTHORINFO_V1@@