'शिवाजीचे उदात्तीकरण' पुस्तकावर बंदी घालावी : निरंजन डावखरे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Feb-2020
Total Views |

niranjan davkhare_1 
 
 
ठाणे : महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांवर अपमानजनक, आक्षेपार्ह आणि दर्जाहीन लेखन केलेल्या डॉ. विनोद अनाव्रत यांच्या `शिवाजीचे उदात्तीकरण : पडद्यामागचे वास्तव' पुस्तकावर तातडीने बंदी घालावी. तसेच पुस्तकाचे लेखक व प्रकाशकाला अटक करुन, बाजारपेठेत विक्रीसाठी असलेल्या प्रती ताब्यात घ्याव्यात. अशी मागणी भाजपाचे आमदार व शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर या पुस्तकातील उतारे समाजमाध्यमांवर प्रकाशित करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई करावी, असेदेखील त्यांनी म्हंटले आहे.
 
 
 
पुणे येथील सुगावा प्रकाशन संस्थेने लेखक डॉ. विनोद अनाव्रत यांचे `शिवाजीचे उदात्तीकरण : पडद्यामागचे वास्तव’ पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकात जवळजवळ प्रत्येक वाक्यागणिक छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना दूषणे देण्यासाठी हे पुस्तक बाजारात आणण्यात आले असल्याचा शिवप्रेमी जनतेचा आरोप आहे. या पुस्तकाची बाजारपेठेत विक्री सुरू असून, ती ताबडतोब रोखावी, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनाही निवेदन देऊन, ठाणे जिल्ह्यात कारवाईचा आग्रह धरला आहे.
 
 
 
 
वादग्रस्त पुस्तकाचे शीर्षकच आक्षेपार्ह आहे. तसेच संपूर्ण पुस्तकातील अन्य शीर्षके व उपशीर्षकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी तुच्छ्ताभाव दाखविण्यात आला आहे. तो महाराष्ट्रातील जनता कदापि सहन करणार नाही. पुस्तकातील तब्बल ६० पाने `रयतेचा खरा राजा कोण : शिवाजी की औरंगजेब’ या प्रकरणावर खर्ची घालून, औरंगजेबाला महान दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकातील उतारे काही विशिष्ट मंडळींकडून सोशल मिडियावर वेगाने प्रसारित केले जात आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी होत आहे. त्यामुळे या प्रकरणी तातडीने पावले उचलून समाजमाध्यमांवर छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी आमदार डावखरे यांनी केली आहे.
 
 
 
"अभिव्यक्तीस्वातंत्र्य मान्य, पण छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी नको"
 
 
 
"अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा आम्हाला मान्य आहे. मात्र, देशभराचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. या पुस्तकावर बंदी न आल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू," असा इशारा आमदार निरंजन डावखरे यांनी दिला.
 
 
@@AUTHORINFO_V1@@