दिल्ली विधानसभा निवडणूक : ‘आप’च्या ३६ उमेदवारांवर गुन्हे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Feb-2020
Total Views |

aam admi party _1 &n



नवी दिल्ली
: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण ढवळले असून गुन्हेगारी उमेदवारांमध्ये सत्ताधारी आम आदमी पक्ष आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. ‘आप’च्या तब्बल ३६ उमेदवारांवर गुन्हे दाखल असल्याचे ‘असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म’च्या (एडीआर) अहवालातील आकडेवारी सांगते.



विधानसभा निवडणूक जवळ येत असतानाच, राजकीय पक्षांशी संबंधित एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. विधानसभा निवडणूक लढविणार्या एकूण ६७२ उमेदवारांपैकी २० टक्के (१३३) उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे, सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या ५१ टक्के उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत.




या संस्थेच्या अहवालानुसार, दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे २५ टक्के उमेदवार आणि भाजपच्या २० टक्के उमेदवारांनी निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्याविरोधात गंभीर गुन्हे असल्याचे नमूद केले आहे. काँग्रेसच्या १५ टक्के उमेदवारांनीही आपल्याविरोधात गंभीर गुन्हे दाखल असल्याचं प्रतिज्ञापत्रात जाहीर केले आहे. आपच्या ३६ उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल आहेत, तर भाजपच्या ६७ पैकी १७ उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल आहेत. यामध्ये काँग्रेस तिसर्या,, तर बसप चौथ्या स्थानी आहे. याबाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पाचव्या क्रमांकावर आहे. २०१५च्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत गुन्हेगार उमेदवारांची संख्या अधिक आहे. त्यावेळी निवडणूक रिंगणात ६७३ उमेदवार होते. त्यातील ११४ उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल होते. यावेळी सर्वाधिक श्रीमंत तिन्ही उमेदवार आम आदमी पक्षाचेच आहेत. ८ फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. ६७२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ११ फेब्रुवारी रोजी याचे निकाल जाहीर होणार आहेत.
@@AUTHORINFO_V1@@