मनूवाद्यांचा निषेध!!!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Feb-2020   
Total Views |

vedh _1  H x W:


माझे विठ्ठल, अंहं, पंढरपूरचे विठ्ठल नाहीत काही, तर ते सिल्वर ओकचे विठ्ठल, त्यांनी तर लवासा बनवले, छे, छे लवासाच नाही तर एखादा माणूस समाजाला किती बनवू शकतो, याचा रेकॉर्डच त्यांनी मोडलेला. तर असे हे आमचे विठ्ठलसाहेब. त्यांचा मी चेला.




आम्ही काय खावे, काय प्यावे, हे सुद्धा लोकच ठरवायला लागलेत. काय म्हणावं लोकांना? गरिबी हटवू, गरिबी हटवू म्हणून गरीबांनाच हटविण्यात आमचा हातखंडा. ब्राह्मण विरुद्ध इतर, इतर विरुद्ध मराठा, हिंदू विरुद्ध मुस्लीम असे समाजाचे मस्त तुकडे पाडण्याचा आमचा अनुभव दांडगा आहे. समाज असा लेगपिससारखा वेडावाकडा तोडण्यात आम्ही एक्स्पर्ट. पण काल आम्ही काय एक मेलेल्या कोंबडीचा लेगपिस खाल्ला तर लोक आम्हाला नाव ठेवायला लागले. काहीही म्हणा लोकांना बरीच अक्कल आली आहे राव. यापूर्वी आम्ही भूखंडच्या भूखंड खाल्ले. ते भूखंड खाऊन शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेऊन समाजाला मूर्खही बनवले. पण कुणी कुणी काही म्हणाले नाही.



माझे विठ्ठल, अंहं, पंढरपूरचे विठ्ठल नाहीत काही, तर ते सिल्वर ओकचे विठ्ठल, त्यांनी तर लवासा बनवले, छे, छे लवासाच नाही तर एखादा माणूस समाजाला किती बनवू शकतो, याचा रेकॉर्डच त्यांनी मोडलेला. तर असे हे आमचे विठ्ठलसाहेब. त्यांचा मी चेला. त्यांनी ‘अशी ही बनवाबनवी’चा खेळ कित्येक दशके महाराष्ट्रात खेळला. आता सरकार बनवताना या खेळाचा क्लायमॅक्स केला. असो, तर मुद्दा असा की, साहेब कधीही आदिवासींच्या पाड्यात जाताना दिसले नाहीत. मी तर काय माझी जहागिरी मुंब्रा सोडून कुठेच जात नाही. तिला लोक ‘मिनी पाकिस्तान’ म्हणतात. भारताचे तुकडे पाडू इच्छिणार्याम वंदनीय कन्हयाकुमार यांना अख्ख्या महाराष्ट्रात सेफ वाटते ते फक्त माझ्या मुंब्र्यामध्ये. तर असा हा मुंब्रा सोडून मी आदिवासींच्या झोपडीत गेलो. जेवलो. आता जेवताना आमच्यासोबत कुणी आदिवासी बांधव बाजूला बसले नाहीत. मग आमचे स्टेटसच आहे तसे. प्रत्यक्ष जाणते राजे, विठ्ठल आणि त्यांचा दास म्हणजे मी, आम्ही दोघे असताना, कुणा आदिवासी बिदीवासीची गरजच काय? तसेही आम्ही खाण्यात एक्स्पर्टच आहोत. जिथे जाऊ तिथे खाऊ. त्यामुळे आम्ही दोघेच जेवलो. आजूबाजूला कुडाच्या भिंती होत्या, कुडाच्या! पण आम्ही जेवलो त्या झोपडीत. लोकांना त्याचे कौतुकच नाही. त्यांना दिसले आलिशान खुर्च्या, टिपॉय, कोंबडीचा रस्सा, भाकरी, बिसलरी पाण्याच्या बाटल्या. लोक ना मनूवादी बनत चालली आहेत. निषेध या मनूवाद्यांचा!



कायदेशीर तीन दिवसांची सुट्टी



शोआराम, आलिशान जगण्याची सवय असलेल्या नेत्यांनी त्यांच्या गरीब अनुयायांसारखे, कार्यकर्त्यांसारखे जगण्याचा प्रयत्न करावा, ही संस्कृती निदान काँग्रेस आणि राष्ट्रवादीची तर मुळीच नाही. कारण, त्यांच्याकडे काही न करता श्रीमंत होण्याचे अनोखे तंत्रज्ञान आहे. खरे म्हणजे त्यांच्याकडेच काय? राजकारणात उतरलेली प्रत्येक दुसरी पिढीही तोंडात चांदीचा नव्हे सोन्याचा चमचा घेऊनच जन्मते. त्यांचे आजोबा किंवा पिताश्री असा काय उद्योग करत होते की, ज्यामुळे त्यांच्या सात पिढ्यांचे कोटकल्याण झाले? असा फालतू प्रश्न विचारायचाच नसतो. उगीच नाही महाविकास आघाडीच्या मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या होत्या की, “आताच तर शपथ घेतली, अजून खिसे गरम व्हायचे आहेत.”



हे खिसे गरम करण्यासाठी नीतीमत्ता, आपल्या बापजाद्यांची इज्जत सगळे धुळीला मिळवत निर्ल्लज्ज होऊन फक्त आणि फक्त सत्ताधारी व्हायचे, बस एकच लक्ष्य. काल ज्यांचे तोंडही पाहायची इच्छा नसते, त्यांचे सत्ता मिळवण्यासाठी पायही धरायचे संस्कृती महाराष्ट्रात उभी राहिली. या पापाचे धनी कोण? अर्थात यावर सगळे तथाकथित विचारवंत, पुरोगामी थंड आहेत. कारण, सत्तेच्या बाजारात सत्ताधिशांच्या नंगानाचालाही पवित्र पूजा म्हणण्याचे स्वार्थी कसब त्यांच्याकडे आहे. महाराष्ट्राने आजपर्यंत नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसणार्याण नेत्याला पाहिले होते, सहनही केले होते. पण जनतेच्या विश्वासावर खंजीर खुपसताना महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिले. पण हे कशासाठी? उत्तर सोपं आहे, सत्तेसाठी. सत्ता असेल तर ऐशोआराम आहे. मनाला वाटेल ते लोकांवर लादू शकतो. लोकांना दिवसाचे जगणे मुश्किल आहे, त्या समस्या न सोडवता नाईट लाईफचे सोंग रचू शकतो. गरीबांचे काय हो, त्यांच्या मागनुटीवर बसलेला चिंतेचा वेताळ, पुढे त्याच्या सात पिढ्यांच्या मानगुटीवरही तसाच बसतो. त्यातून त्या गरीबांची सुटका नाही. पण सत्ता मिळवली ती येनकेनप्रकारे टिकवली तर मग काय? मजाच मजा. आदिवासी पाड्यातही पंचतारांकित जेवणावळी उठवता येतात, कोंबडीच्या रश्श्यासकट. तसेच महाबळेश्वरमध्येही स्वित्झर्लंड गेला बाजार राहुल गांधींचे थायलंड अवतीर्ण होऊ शकते, तेही कायदेशीर तीन दिवसांची सुट्टी घेऊन.
@@AUTHORINFO_V1@@