शरजीलच्या भाषणानंतर काही वेळातच जामियानगरमध्ये दंगे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Feb-2020
Total Views |

sharjeel Imam_1 &nbs



नवी दिल्ली : शाहीनबाग येथे देशविरोधी भाषण आणि जामिया दंगली प्रकरणात अटक झालेल्या जेएनयूचा माजी विद्यार्थी शरजील इमामच्या चिथावणीखोर भाषणानंतर जवळजवळ अर्ध्या तासाने जामिया नगर आणि न्यू फ्रेंड्स कॉलनीमध्ये दंगल सुरू झाली. मात्र तो यावेळी दंगलग्रस्त भागात उपस्थित नव्हता हे दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (एसआयटी) तपासात हे उघड झाले आहे. जामिया नगर दंगलीतील भूमिकेनंतर एसआयटीने शरजीलला एका दिवसाच्या पोलिस कोठडीत ठेवले आहे.


एसआयटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, १५ डिसेंबर रोजी जामिया नगरनंतर शरजीलने दुपारी शाहीनबाग येथे भाषण केले. असा आरोप केला होत आहे की, शरजीलने आपल्या चिथावणीखोर भाषणाने लोकांना सर्व मोठे मार्ग आणि चौक रोखण्यासाठी आणि सीएएच्या विरोधात हिंसा व तोडफोड करण्यास प्रवृत्त केले. त्याने आपल्या भाषणात आसामला भारतपासून वेगळे करण्याबाबतही भाष्य केले. यानंतर शाहीनबाग येथून मोठ्या संख्येने निदर्शक जामिया नगरात आले आणि तेथे दंगल सुरू झाली. मात्र, दंगलच्या वेळी शरजील जामिया नगरमध्ये नव्हता.


तो शाहीनबागमध्येच थांबला होता. रात्री अकराच्या सुमारास तो जेएनयूमध्ये गेला. एसआयटी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार,
शरजीलला जामिया नगर आणि शाहीनबागमध्ये भाषण करण्यास कोणीही बोलावले नव्हते. तो स्वत: भाषण देत असत आणि भाषणेही तयार करीत असत. तो जेएनयूचा विद्यार्थी आहे त्याने पीएचडी केलेली आहे. हे ऐकून लोक खूप प्रभावित झाले. त्यानंतर तो भाषण देण्यासाठी स्टेजवर चढत असत. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शरजीलने जामिया नगर आणि शाहीनबागमधील सीएएविरोधात मशिदीच्या आसपास चिथावणीखोर पोस्टर्सचे वाटप केले होते. एसआयटीने त्याच्याजवळील पोस्टर्स आणि पत्रके जप्त केली आहेत.
@@AUTHORINFO_V1@@