'शेमारू मराठीबाणा'वर 'छत्रपती शासन'चे वर्ल्डे टेलिव्हिजन प्रिमिअर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Feb-2020
Total Views |


chhatrapati shasan_1 

 
 

मुंबई : मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्‍याच्‍या वचनाशी बांधील राहत शेमारू मराठीबाणा या शेमारू एंटरटेन्‍मेंट लि.ने नवीनच सादर केलेल्‍या मराठी चित्रपट चॅनेलने लोकप्रिय मराठी चित्रपटांच्‍या नवीन लाइन-अपची घोषणा केली. मराठी अभिमानाशी संलग्‍न असलेले शेमारू मराठीबाणा आज शिवजयंतीनिमित्त संतोष जुवेकर, मकरंद देशपांडे व किशोर कदम अभिनीत लोकप्रिय चित्रपट 'छत्रपती शासन'चे वर्ल्‍ड टेलिव्हिजन प्रिमिअर सादर करत आहे. चॅनेल नेहा पेंडसे, उमेश कामत व प्रसाद ओक अभिनीत चित्रपट 'बाळकडू', 'फोटोकॉपी', 'बकुला नामदेव घोटाळे', 'पोरबाजार', तसेच 'जजमेंट' व 'लग्‍न मुबारक' अशा लोकप्रिय चित्रटांचे वर्ल्‍ड टेलिव्हिजन प्रिमियर्स आणि अनेक कौटुंबिक मनोरंजनपूर्ण चित्रपट सादर करणार आहे. वर्ल्‍ड टेलिव्हिजन प्रिमियर्सचे प्रसारण दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता करण्‍यात येईल.

 

महाराष्‍ट्र व गोव्‍यामधील मराठी भाषिक प्रेक्षकांचे उच्‍च दर्जाच्‍या मराठी चित्रपट/नाटकांसह मनोरंजन करण्‍याच्‍या एकमेव उद्देशासह नुकतेच शेमारू मराठीबाणा चॅनेल सुरू करण्‍यात आले. या चॅनेलकडे त्‍यांच्‍या प्रेक्षकांसाठी खासरित्‍या तयार करण्‍यात आलेल्‍या मराठी कन्‍टेन्‍टची रेंज आहे. शेमारू मराठीबाणाचा महाराष्‍ट्रामध्‍ये घडलेल्‍या संस्‍मरणीय प्रसंगांना साजरे करण्‍यावर विश्‍वास आहे आणि त्‍यांच्‍याकडे या खास दिवसांना अनुसरून चित्रपटांची रेंज आहे. प्रसारित करण्‍यात येणा-या रेंजमध्‍ये शिवजयंतीसाठी सुपरहिट चित्रपट 'छत्रपती शासन', महिला दिनासाठी 'जजमेंट' आणि होळीसाठी 'पोश्‍टर गर्ल' अशा चित्रपटांचा समावेश असेल. शेमारू मराठीबाणा रोमँटिक कॉमेडी, ड्रामा, कोर्टरुम ड्रामा, कॉमेडी, कालिक ड्रामा अशा अनेक शैलींमधील मनोरंजन सादर करेल. या घोषणेबाबत आनंदित झालेला चित्रपट 'छत्रपती शासन'मधील प्रमुख अभिनेता संतोष जुवेकर म्‍हणाला, ''शेमारू मराठीबाणा चॅनेलच्‍या टीमचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्‍छा. अशी उत्तम संधी देण्‍यासाठी तुम्‍हा सर्वांचे आभार. तुम्‍ही आमचे सर्व मराठी चित्रपट आणि आमचे प्रेक्षक व चाहत्‍यांसाठी एक उत्तम चॅनेल सुरू केले आहे. या नवीन प्रवासासाठी शुभेच्‍छा.''

 

याप्रसंगी बोलताना अत्‍यंत प्रतिभावान अभिनेता मकरंद देशपांडे म्‍हणाला, ''शिवजयंतीच्‍या शुभप्रसंगी नुकतेच नवीन सुरू झालेले चॅनेल शेमारू मराठीबाणावर माझा चित्रपट 'छत्रपती शासन'चे वर्ल्‍ड टेलिव्हिजन प्रिमियर प्रसारित होण्‍याची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे. माझ्या चाहत्‍यांना ही कथा सादर करण्‍यासाठी यासारखा दुसरा चांगला दिवस नाही. या चित्रपटामध्‍ये छत्रपती शिवाजी महाराजांची विचारसरणी आणि ती विचारसणी कशाप्रकारे आजच्‍या समाजामध्‍ये उत्तमरित्‍या परिवर्तन घडवून आणू शकते या गोष्‍टीला दाखवण्‍यात आले आहे. प्रत्‍येक कलाकाराची आयकॉनिक बॅनर्सशी संलग्‍न असण्‍याची इच्‍छा असते. शेमारू मराठीबाणासोबत या सहयोगाच्‍या माध्‍यमातून मी अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचत त्‍यांचे मनोरंजन करेन आणि उत्तम मनोरंजन देण्‍याचे वचन पूर्ण करेन. शेमारू मराठीबाणा हे मराठी चित्रपट चॅनेल मराठी अभिमानाशी संलग्‍न आहे. तसेच हे चॅनेल सर्वोत्तम मराठी संस्‍कृतीला सादर करणा-या चित्रपटांसह प्रेक्षकांचे मनोरंजन करते. शेमारूला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळावे अशी मी शुभेच्‍छा देतो. मी शेमारूसोबत काम करण्‍यासह भविष्‍यात अधिकाधिक प्रकल्‍पांसाठी त्‍यांच्‍यासोबत भागीदारी करण्‍यासाठी उत्‍सुक आहे.'' शेमारू मराठीबाणा हे कौटुंबिक मनोरंजन देणारे चित्रपट चॅनेल आहे. चॅनेलवरील सध्‍याची चित्रपटांची रेंज निश्चितच सर्व वयोगटातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करेल. 'छत्रपती शासन', 'फोटोकॉपी', 'पोरबाजार', 'पोश्‍टर गर्ल' यांसारख्‍या चित्रपटांसह 'बकुला नामदेव घोटाळे', 'जजमेंट', 'बाळकडू', 'आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर', 'झपाटलेला २', 'लग्‍न मुबारक' यासारखे सुपरहिट चित्रपट प्रसारित करण्‍यात येणार आहे. प्रेक्षकांना व्हिज्‍युअल ट्रिट मिळणार आहे आणि संतोष जुवेकर, सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, सोनाली कुलकर्णी, सई ताम्‍हणकर, अंकुश चौधरी, तेजश्री प्रधान, प्रार्थना बेहेरे अशा त्‍यांच्‍या आवडत्‍या मराठी कलाकारांचे सुपरहिट चित्रपट पाहायला मिळणार आहेत.

 
 
@@AUTHORINFO_V1@@