राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकरांना धमकी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Feb-2020
Total Views |
bhau torsekar_1 &nbs




सोशल मिडीयावर पोस्ट केला धमकीचा व्हिडीओ



मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मालेगाव प्रकरणातील सहभागाबाबत भाष्य केल्याच्या रागातून ज्येष्ठ पत्रकार आणि ‘दै. मुंबई तरुण भारत’चे माजी संपादक भाऊ तोरसेकर यांना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने मारहाणीची धमकी दिली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सुरज चव्हाण याने ‘तोरसेकर हा इशारा समजा नाहीतर सल्ला समजा...’, असे लिहित हा धमकीचा व्हिडीओ ट्वीटरवर पोस्ट केला आहे. ‘तुमची तंगडी तुमच्या गळ्यात घातल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, गाठ आमच्याशी आहे हे विसरू नका', असे या व्हिडीओत त्याने म्हंटले आहे.

या आधी राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने भाऊ तोरसेकर समाज माध्यमांमधून शरद पवार यांच्या हत्येची चिथावणी देत असल्याचा नाहक आरोप लावत पोलीस ठाण्यात केली होती. ‘मागील काही महिन्यांपासून समाज माध्यमांवर टोकाच्या विद्वेशाची भावना पसरवणे, तसेच जातीय तणाव निर्माण करून महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय ऐक्याला तडा जातील, अशा अनेक पोस्ट सोशल मीडियावर आपण पाहत आहे. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीचे राजकारण थांबल्यानंतर हा प्रकार कमी होईल, असे वाटत होते. त्यामुळे याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर पत्रकार भाऊ तोरसेकर आणि इतरांकडून सातत्याने युट्यूब, पोस्टमन पोर्टल आदी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमधील भाषणे पाहिली तर तरुणांमध्ये व समाजात शरद पवार यांना संपवले पाहिजे, बॉम्ब व गोळ्यांचा वापर केला पाहिजे, अशी चिथावणीखोर वक्तव्ये केल्याचे निदर्शनास आले आहे,’ असे या तक्रारीत म्हटले होते.



@@AUTHORINFO_V1@@