दादर, प्रभादेवी चौपाट्या चकाचक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Feb-2020
Total Views |

RSS prabhadevi_1 &nb
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंग दलाने संयुक्तरित्या राबविलेल्या स्वच्छता अभियानाला नागरिक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रा. स्व. संघ प्रभादेवी नगरच्या वतीने दादर आणि प्रभादेवी या दोन ठिकाणच्या चौपाट्यांवर नुकतेच स्वच्छता अभियानाचे आयोजन केले होते.
 
 
सकाळी आठ ते दहा वाजपेर्यंत सुरु असलेल्या या सफाई अभियानादरम्यान अनेकांनी आपला सहभाग नोंदवला. रा. स्व. संघ, बजरंग दल आणि परिसरातील महाविदयालयांचे रा. से. यो. विभागचे एकूण ५० स्वयंसेवक उपस्थित होते. हा उपक्रम सुरु झाल्यानंतर तो पाहून प्रेरित झालेल्या काही स्थानिक नागरिकांनीही यात सहभाग घेतला.
@@AUTHORINFO_V1@@