नागराज मंजुळे साकारणार ‘शिवत्रयी’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Feb-2020
Total Views |
nagraj_1  H x W





रितेश देशमुख करणार चित्रपटाची निर्मिती


मुंबई : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी चाहत्यांना आणि शिवप्रेमींना शिवजयंतीनिमित्त एक विशेष भेट दिली आहे. नागराज मंजुळे लवकरच शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. चित्रपटाचा टिझर ट्विट करत त्यांनी चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे. अभिनेता रितेश देशमुख या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.


अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी-अभिनेत्री जेनेलिया देशमुख दोघे मिळून शिवरायांच्या आयुष्यावरील चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. दिग्दर्शक रवी जाधव यांच्यासोबत रितेश हा चित्रपट करणार होता. परंतु आता हा चित्रपट नागराज मंजुळे करणार आहेत. तर या भव्य अशा चित्रपटाला संगीत देण्याची धुरा अर्थातच अजय-अतुल यांना सोपावण्यात आली आहे. २०२१ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.




नागराज मंजुळ यांच्या ट्विटवरून चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल चर्चा सुरू झाली आहे. ‘शिवाजी’, ‘राजा शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी’ अशी ही चित्रपटांची 'शिवत्रयी' असणार आहे. 'एखाद्या स्वप्नाच्या उंबरठ्यावर उभं राहणं म्हणजे हेच असावं कदाचित,' असे म्हणत नागराज यांनी चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे.
@@AUTHORINFO_V1@@