छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बारकाईने वाचा : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Feb-2020
Total Views |

shahajijai_1  H



मुंबई
: "शिवचरित्र बारकाईने वाचा, त्याचे संदर्भ बारकाईने अभ्यासल्यास आपणास एका उत्तुंग प्रतिभा असणाऱ्या राजाची प्रचिती येईल," असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी गोवा ताब्यात घेण्यासाठी दिलेल्या लढ्याचा रोमांचक इतिहास शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी बुधवारी कथन केला. ज्येष्ठ साहित्यिक व ऐतिहासिक कादंबरीकार शिरीष गोपाळ देशपांडे यांच्या बहुप्रतीक्षित 'शहाजिजाई' कादंबरीचा प्रकाशन सोहळा बुधवारी उत्साहात पार पडला. विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयात पार पडलेल्या या सोहळ्याचे अध्यक्षस्थान शिवशाहीर बाबाबासाहेब पुरंदरे यांनी भूषविले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त उपस्थित होते.
 


यासंपूर्ण तीन कादंबऱ्यांच्या लेखनाविषयी सांगताना लेखक शिरीष देशमुख म्हणाले, खरंतर आईच्या पोटात असल्यापासूनच मला शिवाजी आणि इतिहासाची मुळे माझ्यात रुजली. शिवाजी महाराज झाले कारण त्यांच्यावर जिजाई आणि शहाजी यांचे संस्कार रुजले. हेच संस्कार या तीनही कादंबऱ्यामधून सांगण्याचा हा प्रयत्न मी केला.या तीनही कादंबऱ्याचा बहुतांश भाग हा शहाजी राजांनी व्यापलेला आहे. कारण स्वराज्य ही संकल्पना साकारण्याचा अट्टाहास त्यांनी बांधला त्यापैकी एक प्रयत्न म्हणजे शिवाजीराजे. आणि शहाजींचा हाच संकल्प छत्रपती होऊन शिवाजींनी पूर्ण केला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दिग्दर्शक राजदत्त यांनी राजा या संकल्पनेचा उलगडा आपल्या भाषणातून व्यक्त केला. ते म्हणाले मी जेव्हा ही कादंबरी वाचायला घेतली तेव्हा मी विचार करत राहिलो की राजा ही कल्पना नेमकी केव्हा आली, याचा इतिहास शोधण्याचा मी प्रयत्न केला. त्याच उत्तर मला या कादंबऱ्यामध्ये मिळाले.आपण जर ही कादंबरी वाचायला घेतली तर शब्दातून वास्तव्याकडे नेणारी दृश्ये आपल्यासमोर उभी राहतील. शहाजीच्या स्वप्नाचा उलगडा आपणास या कादंबरीत जाणवेल, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
 


"आपल्या भाग्याचा हेवा वाटावा असा क्षण मी आज अनुभवत आहे. अशा ऐश्वर्य संपन्न व्यासपीठावर मी आहे हे माझे भाग्य आहे",असे म्हणत या कार्यक्रमाचे मुख्य प्रवक्ते प्रमोद बापट यांनी शिवप्रेरणेचा प्रभाव व त्याचे आजच्या काळातील महत्व सांगितले. ते म्हणतात, "स्वातंत्र मिळवून उपयोग नाही ते स्वातंत्र्य टिकवता आले पाहिजे. आज 'आझादी' हा शब्द एक वेगळ्या अर्थाने माखला आहे. आज आझादी मागतायेत ती कशापासून तर भारतीयत्वापासून, भारतीय असण्यापासून. आज जर ही तोंड बंद करायची असेल तर त्यासाठी गरजेचं आहे शिवचरित्र. शिवप्रेरणाच या भारतीयत्वापासून आझादी मागणाऱ्याची तोंड बंद करू शकते येवढी ताकद आहे शिवचरित्रात", असे म्हणत प्रमोद बापटांनी सध्याच्या आझादीच्या घोषणा देणाऱ्यांवर अप्रत्यक्षपणे टीका केली.
 


शिरीष गोपाळ देशपांडे यांची पहिली कादंबरी राजा शहाजी ही २००७ मध्ये, शिवाजी महाराजांचे समग्र व्यक्तिमत्वचे दर्शन घडविणारी 'राजा शिवछत्रपती' ही २०१७मध्ये तर त्यांनंतर आता २०२०मध्ये  'शहाजिजाई' ही कादंबरी आज प्रकाशित होत आहे. प्रमोद बापट यांनी या तीनही कादंबऱ्याचा उल्लेख 'त्रिदल' असा केला. "राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाला शहाजी व जिजामाता यांनी नेमका कसा आकार दिला हे सांगण्याचा यथार्थ प्रयत्न मी या कादंबरीतून केला आहे." असे लेखक शिरीष देशपांडे यावेळी म्हणाले. या कादंबरीचे मुखपृष्ठ शिरीष देशपांडे यांचा मूलगा अभिषेक देशपांडे याने बनविले आहे.या कार्यक्रमास राजे शहाजी यांची भूमिका साकारलेले अभिनेते अविनाश नारकर यांच्यासह चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@