'ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्यांचे सोईस्कर मौन' : अतुल भातखळकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Feb-2020
Total Views |


atul bhatkhalkar _1 


'हिंदू दहशतवादाच्या मुद्यावर ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या 'दै. सामना'चे सोयीस्कर मौन'


मुंबई
: हिंदू दहशवादाच्या मुद्यावर ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेने मुंबई दहशतवादी हल्ल्याला भगवा रंग देणाऱ्याबाबत सोयीस्कर मौन बाळगल्याची टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर केली. 'दैनिक सामना'मधील बातमीचा हवाला देत त्यांनी हे टीकास्त्र सोडले. तसेच शिवसेना सत्तेसाठी आता हिंदू दहशतवादाचा बनाव रचणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादीची ही पाठराखण करत असल्याची टीका त्यांनी केली.
 
 
 
आमदार भातखळकर ट्विटमध्ये म्हणतात,'हिंदू दहशतवादाच्या मुद्यावर ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या सामनाचे सोयीस्कर मौन. हिंदू दहशतवादाचे भूत उभे करणारे स्वयंघोषित जाणते राजे सरकार मध्ये सामील असल्यामुळे शेपूट....' अशा तीव्र शब्दांत त्यांनी टीका केली.





पाक गुप्तचर यंत्रणेने मुंबई दहशतवादी हल्ल्याला भगवा रंग देण्याचा प्रयत्न केला होता, असा गौप्यस्पोट राकेश मारिया यांनी आपल्या आत्मचरित्रात केला आहे. तसेच या हल्ल्यातील एकमेव दहशदवादी अजमल कसाब याच्या बाबतही धक्कादायक खुलासे केले आहेत. राकेश मारिया यांनी आपल्या पुस्तकात दावा केला आहे की, पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने २६/११च्या हल्ल्याला हिंदू दहशतवादाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला होता. बनावट हल्लेखोर दहा हल्लेखोरांना हिंदू असल्याचे सिद्ध करण्यासाठी पाठविण्यात आले होते. हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी समीर चौधरीच्या नावे एक बनावट ओळखपत्र कसाबजवळ सापडले होते.



@@AUTHORINFO_V1@@