'कोरोना'चा कहर...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Feb-2020
Total Views |
corona_1  H x W

'कोरोना'मुळे केवळ चीनच नाही, तर संपूर्ण जगभरात चिंतेचे वातावरण आहे. तेव्हा, हा 'कोरोना' विषाणू म्हणजे नेमके काय, त्याची लक्षणे कोणती, काय काळजी घ्यावी, हे जाणून घेऊया.

नुकतेच चीनमध्ये नवीन 'कोरोना' व्हायरसचा फैलाव आढळून आला आहे. कोणत्याही पूर्व लक्षणांशिवाय व्हायरल न्यूमोनियाने पीडित हजारो नागरिकांवर या नवीन व्हायरसचा प्रभाव दिसून आला आहे. या व्हायरसमुळे हुबेई प्रांताच्या वुहान शहरामध्ये दीड हजारांवर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नवीनच हाती आलेल्या माहितीनुसार, हा व्हायरस दक्षिण कोरिया, थायलंड व जपान या देशांपर्यंतदेखील पसरला आहे. 'कोरोना' व्हायरसबाबत जगामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भारतासह कित्येक देशांनी चीनमधून आपापल्या देशांच्या नागरिकांना सुरक्षितरित्या मायदेशी आणले आहे आणि चीनमध्ये प्रवास करण्यास मज्जाव केला आहे.
 
वैज्ञानिक, संशोधक व डॉक्टर्स '२०१८-सीओव्ही' म्हणून ओळखल्या जाणार्यान या व्हायरसचा अभ्यास करत आहेत. पण, 'कोरोना' व्हायरस मानवांमध्ये पहिल्यांदाच आढळून आला असल्यामुळे या व्हायरसवर उपचार करू शकणारी कोणतीच लस अद्याप उपलद्ध नाही. चीनमध्ये ये-जा करणार्याय प्रवाशांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या प्रतिनिधींनी चीनमधून येणार्या प्रवाशांना या आजाराची लक्षणे आढळून आल्यास जवळच्या सार्वजनिक आरोग्य केंद्रामध्ये जाण्याची विनंती केली आहे.
 
 
काय आहे 'कोरोना' व्हायरस?
 
'कोरोना' व्हायरस हा प्रामुख्याने सस्तन प्राणी व मानवांच्या श्वसनसंस्थेवर लक्ष्य करणार्या् विषाणूंचा समूह आहे. यामध्ये सुलभपणे उपचार करता येऊ शकतील, अशा आजारांची लक्षणे दिसून येतात, जसे घसा दुखणे, फ्लू व ताप आणि 'मिडल इस्टआ रिस्पेयरेटरी सिंड्रोम' (एमईआरएस-सीओव्हीर) आणि 'सिव्हीअर अॅक्युहट रेस्पिरेटरी सिंड्रोम' (एसएआरएस-सीओव्हीआ) असे गंभीर आजारदेखील दिसून येतात.
 
 
या आजाराची लक्षणे कोणती?
जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्यूएचओ) मते श्वास घेण्यामध्ये त्रास होणे, खोकला, सुका खोकला, जठर व आतड्यांशी निगडित समस्या, अतिसार आणि चढता ताप ही संसर्गाची काही लक्षणे आहेत. गंभीर स्थिती असल्यास न्यूमोनियासह 'अॅक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम यांचेदेखील निदान होऊ शकते आणि मृत्यूदेखील होऊ शकतो.
 
घ्यावयाची काळजी
तुम्ही गेल्या १४ दिवसांमध्ये कोणत्याही संसर्गित देशांमध्ये प्रवास केला असेल आणि वर उल्लेख केलेली कोणतीही लक्षणे दिसून येत असतील तर डॉक्टरांना भेटून तुमची सर्व माहिती सांगा. तुमची योग्य काळजी घेत असल्याची खात्री घ्या, ज्यामध्ये हाताच्या स्वच्छतेसोबत श्वसनविषयक स्वच्छतादेखील समाविष्ट आहे.
 
आसपासचा परिसर स्वच्छ ठेवा.
कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून आल्यास मेडिकल मास्क परिधान करा.
खोकताना आणि शिंकताना नाक व तोंडावर रूमाल धरा.
श्वसनस्रावाशी संपर्क आल्यास हात स्वच्छ धुवा.
सर्दी व फ्लू आजार असलेल्या कोणत्याही व्यक्तीशी संपर्क टाळा.
- डॉ. अनिता मॅथ्यू
(लेखिका मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील कन्सल्टंट फिजिशियन व इन्ेफक्शिअस डिसीज स्पेशालिस्ट आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@