पिवळी पिवळी हळद लागली...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Feb-2020
Total Views |
Vicco _1  H x W



कुठल्याही व्यक्तीचे आरोग्य हे केवळ शरीरापुरतेच मर्यादित नाही, तर इतर घटकांचाही मानवी आरोग्यावर परिणाम होत असतो. एखादी व्यक्ती जेव्हा तुम्हाला प्रथमच भेटते, तेव्हा आपली नजर स्वाभाविकपणे चेहर्याहकडे वळते. 'चेहरा हा मनाचा आरसा' असतो. त्यामुळे 'फर्स्ट इंप्रेशन' पडते, तेव्हा चेहरा महत्त्वाची भूमिका पार पाडतो. आपल्याकडे हिंदी चित्रपटात 'चेहरा' अर्थात 'सुरत' यावर असंख्य गाणी आहेत. 'तेरे चेहरे से नजर नहीं हटती, नजारे हम क्या देखें' किंवा 'तेरी प्यारी प्यारी सुरत को किसीकी नजर ना लगे' आणि 'तेरे चेहरे में वो जादू हैं' अशी हिंदी सदाबहार गाणी त्या काळात आणि आजही रसिकांच्या मनावर मोहिनी घालत आहेत. या गाण्यांचा मुख्य विषय प्रामुख्याने चेहरा व तद्अनुषंगाने येणारे सौंदर्य हाच आहे. संपूर्ण व्यक्तिमत्त्वात तुमचा चेहरा ही पहिली ओळख ठरते, म्हणूनच प्रत्येकजण आपल्या दिसण्याबाबत सतर्क असतो.
 
अनेक बऱ्यावाईट गोष्टींचा परिणाम आपल्या त्वचेवर होताना आढळतो. आपल्या शरीराची त्वचा हे संरक्षक कवच आहे. त्यामुळे त्वचा स्वच्छ आणि सुरक्षित ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे आणि जिकिरीचे काम आहे. बदलत्या वातावरणाचा पहिला परिणाम सर्व प्रकारच्या त्वचेवर होतो आणि त्यातून अनेक समस्यांचा जन्म होतो. त्वचा साधारणपणे कोरडी, तेलकट आणि सामान्य प्रकारची असते. प्रत्येकाला अशा प्रकारची त्वचा प्राप्त होते. आरोग्यपूर्ण तेजस्वी त्वचा केवळ शरीरासाठीच नव्हे, तर समाजात वावरतानाही फार महत्त्वपूर्ण ठरते. म्हणून आपण सर्वजण आपल्या दिसण्याबाबत फार जागरुक असतो. आपल्या चेहर्याततील त्वचेसंदर्भातील कोणतेही वैगुण्य आपली झोप उडवू शकते.
 
त्वचेची नियमित काळजी घेणे, त्वचेची आर्द्रता राखणे हे अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहेत. सतेज, सुंदर त्वचा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा स्तर उंचावते. बाह्यत्वचेच्या पोषणासाठी तुमचे शरीरांतर्गत व्यवस्थापनही तितकेच आरोग्यपूर्ण असायला हवे. पुरेशी शांत झोप, योग्य पोषक आहार आणि तणावमुक्त/चिंतामुक्त जीवन याचा सुपरिणाम नक्कीच तुमच्या शरीरावर होत असतो. ॠतूनुसार विविध फळांचे सेवन करणे, शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखणे, योग्य जीवनसत्वयुक्त आहार घेणे हे अत्यावश्यक ठरले आहे. याही बाबींचा सर्वांनी विचार करायला हवा. बर्या चदा अकाली प्रौढत्व, चेहर्याहवरील सुरकुत्या, पुटकुळ्या, डाग यामुळे व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात न्यूनता येते. परमेश्वराने जो नरदेह प्रदान केलाय, तो सुंदर ठेवण्यासाठी त्याचे आरोग्य जपायला हवे. प्रत्येकाने नियमितपणे योगासने करायला हवीत, व्यायाम करायला हवा.
 
आजकाल सार्वत्रिक जीवन धकाधकीचे झाले आहे. त्याचा कळत-नकळत परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर देखील होतोच होतो. वरील बाबी आपल्याला कळत नाहीत असे नाही, पण वळत नाहीत. मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे, आपल्या देशाला आयुर्वेदाची फार मोठी देणगी मिळाली आहे. नैसर्गिक रुपात फार मोठ्या प्रमाणात संपदा आपल्याला लाभलेली आहे. पूर्वापार चालत आलेला ठेवा नेहमी वारसा म्हणून जपून ठेवायचा असतो. कालौघात अनेक बदल झाले आणि आपली जीवनशैली बदलली. वर्षानुवर्षे जतन केलेला 'आजीबाईंचा बटवा' आपण हरवला आणि समस्यांना प्रारंभ झाला. आजच्या धावपळीच्या काळात सौंदर्य टिकवण्यासाठी, वृद्धीसाठी दरवेळी पार्लरमध्ये जाणे शक्य होतेच असे नाही. खरंतर मनुष्याला सौंदर्याची ओढ पूर्वीपासूनच होती. ही ओढ आजही तेवढीच टिकून आहे. किंबहुना, लोक आपल्या सौंदर्याबाबत, दिसण्याबाबत जास्त सजग झाले आहेत. स्त्रियांसाठी 'ब्युटी पार्लर्स' ही संकल्पना मागे पडून आता पुरुषांचीही पार्लर्स आहेत. 'आपण छान दिसावे' असे प्रत्येकाच्याच अंतर्मनात असते. या जाणिवेमुळेच सौंदर्य टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात.
 
फार पूर्वी सौंदर्यवृद्धीसाठी नैसर्गिक गोष्टींवर अधिकतम भर दिला जात असे. सौंदर्यासाठी स्वयंपाकघरात वापरली जाणारी 'हळद' ही अत्यंत महत्त्वाची आहे. हळदीचे औषधी गुणधर्म जगन्मान्य झालेले आहेत. याचा आहारातील वापर यथायोग्यच आहे, पण हळदीची उपयुक्तता सौंदर्यवर्धक आणि जंतुनाशक म्हणून अधिक आहे. विवाहाच्या आधी वधूवरांना हळद लावली जाते ती यासाठीच! आमच्या कुटुंबात आयुर्वेदाचा सातत्याने आणि अगदी हिरिरीने पुरस्कार केला गेला. त्यामुळेच आयुर्वेदिक उत्पादने ही आमची ओळख ठरली आणि ब्रॅण्डही! 'विको'च्या सर्व उत्पादनांनी जनमानसात मानाचे स्थान मिळवले, याचे प्रमुख श्रेय आयुर्वेदिक घटकांकडे जाते. जनसामान्यांची सुरुवात 'विको'च्या उत्पादनांनी होते आणि निद्रादेवीच्या अधीन होण्यापूर्वीही 'विको'ची उत्पादने असतात. संपूर्ण भारतात आयुर्वेदिक घटकांचा वापर करणारी 'विको' ही एकमेव कंपनी ठरली, हा इतिहास अत्यंत रोचक आहे.
 
'विको टर्मरिक आयुर्वेदिक स्कीन क्रिम'ने त्या काळात असंख्य लोकांच्या मनाचा कब्जा मिळवला होता. चित्रपटगृहातील आणि कृष्णधवल टीव्हीवरील जाहिराती सुमधुर, दिलखेचक आणि लोकप्रिय ठरल्या. आताच्या पन्नाशी पार केलेल्या प्रत्येकाने ती विलोभनीय जाहिरात नक्कीच पाहिलेली आहे. मनाच्या कोपर्याीत आजही तो सुगंध दरवळत असेल. असे भाग्य संपूर्णत: प्राचीनतम आयुर्वेदाला आहे. 'विको टर्मरिक आयुर्वेदिक स्कीन क्रिम'ने आजही आपला दर्जा सांभाळला आहे. काळानुसार आकारात आणि पॅकिंगमध्ये बदल झाले, पण 'फेस क्रिम'चा दर्जा मात्र तोच ठेवला. 'विको टर्मरिक फेस क्रिम' म्हणून उल्लेख केला तर तो थोडा अन्याय होईल. कारण, हे 'फेस क्रिम' नसून त्या उत्पादनाचे इतरही फायदे आहेत.
 
हळद आणि चंदनाच्या गुणधर्माने युक्त अशी हे क्रिम नियमित वापरल्याने चेहरा सतेज आणि तजेलदार दिसू लागतो. कोणत्याही वयोगटाच्या स्त्री-पुरुषाला हे क्रिम वापरता येते. 'पिवळसर मऊशार आणि अप्रतिम सुगंधाने युक्त' 'विको टर्मरिक आयुर्वेदिक स्कीन क्रिम' केवळ गंधानेच मेंदूला आणि संपूर्ण तनामनाला तरतरी आणते. ही किमया केवळ हळद आणि चंदन यांच्या एकत्रित गुणधर्मांची! अगदी छोटासा भाग क्षणार्धात चेहर्याकवर हलक्या हाताने पसरवल्यास त्वचेत अलगद झिरपतो. चंदन तेल आणि हळद त्वचा रंध्रात जाऊन कार्यरत होतात. त्यातील सुगंधाने क्रिम वापरणार्या चे आणि आजूबाजूच्या वातावरणाचे रुप पालटते. काही सेकंदात चेहरा सुरक्षित होतो. कोणताही तेलकटपणा नाही की ओलसरपणा नाही. 'विको टर्मरिक'ची ट्यूब उघडली की वातावरणात एकदम प्रसन्नतेचा शिडकावा होतो.
 
सातत्यपूर्ण वापर केल्यास याचे सकारात्मक फायदे अनुभवयास मिळतात. व्यक्तिगणिक त्वचेच्या अनेक तक्रारी आहेत. चेहर्या वरील मुरुमे, डाग, पुटकुळ्या कमी होण्यास मदत होते. कालांतराने ही समस्या उरतच नाही आणि स्त्री असो वा पुरुष आणण्यापूर्वी 'विको परिवारा'ने त्याकाळी किती अथक परिश्रम घेतले असतील, याची केवळ कल्पनाच केलेली बरी! तेव्हा आजच्या सारखे विकसित तंत्रज्ञान नव्हते. दळणवळणाची साधने नव्हती. प्रतिकूल परिस्थितीतून दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर त्या काळात आमच्या आजोबांनी आणि त्यापुढील पिढीने मार्ग काढला आणि आयुर्वेदिक उत्पादने वापरायची सवय लोकांना लावली. आरोग्याचा आणि आयुर्वेदाचा अगदी जवळचा संबंध आहे, असं धाडसी पाऊल त्या वेळी आजोबांनी उचलले, ते 'द्रष्टा' होते.
 
'विको परिवार' पुढे विस्तारला आणि ग्राहकहिताच्या द़ृष्टीने काही बदल केले गेले. त्वचेच्या पोतानुसार (कोरडी-तेलकट-सामान्य) 'विको टर्मरिक'च्या दोन फेस क्रिम आहेत.
1) विको टर्मरिक स्कीन क्रिम
2) विको टर्मरिक डब्ल्युएसओ स्कीन क्रिम (यात चंदनतेलाचा वापर केलेला नाही.)
कापणे, भाजणे, खरचटणे यावर या क्रिम वापरता येतात. कारण, त्यात हळद आहे. हळद जंतुघ्न आहे. संपूर्णत: आयुर्वेदाचा समावेश हाच 'विको' उत्पादनांचा गाभा आहे. कितीही प्रगती केली, पुढे गेलो तरी मनुष्याला त्याच्या मातीची ओढ आणि मुळांची आठवण असतेच. आयुर्वेद पण अशीच ओढ लावतो. आरोग्य आणि आयुर्वेद हे नेहमीच हातात हात घालून चालत राहिले आहेत.
 

- संजीव पेंढरकर
(क्रमश:)
@@AUTHORINFO_V1@@