‘सरकार पाडायचं तेव्हा भाजप पाडेल उद्धव ठाकरेंच्या आव्हानाची गरज नाही’ : नारायण राणे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Feb-2020
Total Views |

narayan rane_1  


सिंधुदुर्ग
: 'सरकार पाडायचं असेल तेव्हा भाजपा पाडेल, त्यासाठी उध्दव ठाकरेंच्या आव्हानाची गरज नाही,' असे म्हणत भाजपचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. सिंधुदुर्ग इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवरून नारायण राणे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दोन दिवसीय कोकण दौरा आज (१८ फेब्रुवारी) पूर्ण झाला. “उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यात कोकणाला काहीही मिळाले नाही. त्यांचा सर्व दौरा हेलिकॉप्टरने होता. ते रत्नागिरीतील नाणार प्रकल्पासंदर्भात एकही शब्द बोलले नाहीत,” अशी टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली.

ते पुढे म्हणाले, “सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनासाठी ओळखला जातो. मात्र या जिल्ह्याला किती निधी मिळाला काहीही सांगितले नाही. कोणत्याही योजनेला मुख्यमंत्र्यांनी पैसे दिले नाहीत. कोकणासाठी कोणतीही आर्थिक तरतूद नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तोंडाला पाने पुसून मुख्यमंत्री परत गेले,” अशी टीकाही नारायण राणे यांनी केली.


'रिफायनरी महाराष्ट्राच्या बाहेर जात असेल तर दोन गोष्टीचा विचार करावा. पैसा महत्वाचा की जनतेचं जीवन महत्वाचे ते ठरवावे. हिम्मत असेल तर रिफायनरी येणार नाही, असा ठराव उध्दव ठाकरे यांनी कॅबिनेटमध्ये मंजूर करावा,' असे आव्हान नारायण राणे यांनी दिले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना शिवाजी राजेंबद्दल आस्था असेल तर 'शिवाजीचं उदात्तीकरण' या पुस्तकावर बंदी घालावी, अशी मागणी नारायण राणे यांनी केली आहे. शिवसेना आणि भाजप सत्तास्थापनेसाठी पुन्हा एकत्र येणार का, अशी चर्चा अधून-मधून वर येत असते. त्याबाबत बोलताना नारायण राणे यांनी मनोहर जोशी यांना टोला लगावला आहे. 'शिवसेना भाजपा पुन्हा एकत्र येतील का ? हे जोशी सरच सांगू शकतील,' असेही राणे म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@