२६/११ला 'भगवा' रंग देण्याचे षडयंत्र : 'पाक'चा बुरखा फाटला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Feb-2020
Total Views |
Azmal Kasab _1  
 
 
 

राकेश मारियांचा गौप्यस्फोट


नवी दिल्ली : पाक गुप्तचर यंत्रणेने मुंबई दहशतवादी हल्ल्याला भगवा रंग देण्याचा प्रयत्न केला होता, असा गौप्यस्पोट राकेश मारिया यांनी आपल्या आत्मचरित्रात केला आहे. मुंबई पोलीस माजी आयुक्त राकेश मारिया यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध होण्यापूर्वीच चर्चेत आले आहे. राकेश मारिया यांनी आपल्या 'लेट मी से इट नाऊ' या पुस्तकात मुंबईतील २६ /११ च्या दहशतवादी हल्ल्यात जिवंत पकडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाबबद्दल मोठा खुलासा केला आहे.
 
 
राकेश मारिया यांनी आपल्या पुस्तकात दावा केला आहे की, पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने २६/११च्या हल्ल्याला हिंदू दहशतवादाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला होता. बनावट हल्लेखोर दहा हल्लेखोरांना हिंदू असल्याचे सिद्ध करण्यासाठी पाठविण्यात आले होते. हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी समीर चौधरीच्या नावे एक बनावट ओळखपत्र कसाबजवळ सापडले होते.
 

कसाबची सुपारी दाऊदच्या गॅंगला दिली

 
कसाबचा फोटो प्रसिद्ध न करण्याचा प्रयत्न त्यावेळी मुंबई पोलीसांनी पुरेपूर प्रयत्न केला होता. अजमल कसाबची सुपारी दाऊदच्या गॅंगला देण्यात आली होती, असा दावाही मारिया यांनी केला आहे. निवृत्त आयपीएस अधिकारी मारिया यांनी केलेल्या या गौप्यस्पोटामुळे मुंबई हल्ला प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.२६/११ हल्ल्यावेळी राकेश मारिया हे मुंबई पोलीस आयुक्त होते. ते आपल्या आत्मचरित्रात म्हणतात, "शत्रू (कसाब) याला जीवंत ठेवणे माझ्यासाठी प्रार्थमिकता होती. कारण त्या काळात कसाब विरोधात जनमानसात एक आक्रोश होता. पोलीस अधिकाऱ्यांनाही राग अनावर झाला होता. पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा आणि 'आयएसआय' यांचा बुरखा फाडण्यासाठी कसाब हाच एक मात्र दुवा होता."
 

कसाबच्या फाशीचा काळ

 
२६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवाद्यांनी तीन ठिकाणी हल्ला केला होता. यात १६६ लोकांनी आपले प्राण गमावले होते. १० हल्लेखोरांपैकी कसाबला जीवंत पकडण्यात पोलीसांना यश आले होते. २१ नोव्हेंबर २०१२ रोजी पुण्यातील येरवडा तुरुंगात कसाबला फाशी देण्यात आली होती. अजमल कसाबला फाशी देण्यात आली.
 
 
 


शीना बोरा हत्याकांडातील खुलासे

  
 
शीना बोरा हत्याकांड या उच्चभ्रू प्रकरणाचा तपासही राकेश मारिया यांनी आपल्या कार्यकाळात केला होता. त्यावेळी या प्रकरणाबद्दलचे अनेक प्रश्न गुढ म्हणूनच राहिले होते. मारिया यांच्या बदलीमुळे त्यांच्याकडून हे प्रकरण काढून घेण्यात आले होते. पीटर मुखर्जी यांना वाचवण्यासाठी मारिया प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांच्यावर झाला होता. शीनाची आई इंद्राणी मुखर्जी, पीटर मुखर्जी आणि इंद्राणीचा पहिला पती संजीव खन्ना यांच्यासोबत एकत्र येत २४ वर्षीय शीनाची २४ एप्रिल २०१२ रोजी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाबद्दलही त्यांनी आपल्या पुस्तकात अनेक खुलासे केले आहेत.



 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@