राज्यात महिला सुरक्षित नाहीत ?, संतप्त नागरिकांची मंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Feb-2020
Total Views |


sexual harassment_1 
सिल्लोडमधील अमानवी प्रकार , अब्दुल सत्तार यांच्याविरोधात घोषणाबाजी


संभाजीनगर (औरंगाबाद) : डोंगरगाव सिल्लोड येथील 32 वर्षीय दलित महिला तिच्या सात वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन गवत आणायला गेली असता अचानक बेपत्ता झाली. आज त्यांच्या दोघीचे विहिरीत प्रेत आढळून आले. पीडितेच्या कुटुंबांनी मिसिंग केस पण दिली होती. प्रेताची अवस्था पाहिल्यास प्रथम दर्शनी बलात्कार, फाशी आणि मग विहिरीत फेकल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. दि. 18 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 8.30 वाजता घाटी रुग्णालयात पोस्टमार्टम होणार झाले मात्र त्याच्या अहवालाविषयी माहिती समोर आलेली नाही.

आज या घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे नेते अमित भुईगळ, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार, वंचितचे जिल्हा अध्यक्ष योगेश बन, वंचितच्या महिला अध्यक्षा लता बामणेताई, पीपल्स व्हाईसचे रवी गायकवाड, वंचितचे शहर अध्यक्ष संदीप शिरसाठ व वंचितचे शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते यांनी प्रशासनावर दबाव आणण्याचं काम केलं. जोपर्यंत आरोपीचा छडा लावला जाणार नाही, तोपर्यंत प्रेत हातात घेणार नसल्याची भूमिका पीडितेच्या कुटुंबियानी घेतली आहे. यावेळी इनकॅमेरा पोस्टमार्टमची मागणी करण्यात आली पोलिसांनी असं करता येत नाही म्हणून विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला. यावेळो अमित भुईगळ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याला बोलून इनकॅमेराच पोस्टमार्टम करण्याची भूमिका सांगितली तेव्हा "होय आम्ही इनकॅमेरा करतो" म्हणून त्यांनी ग्वाही दिली होती.

सिल्लोड मधील ही दुसरी घटना असून अंधारीच्या जवळच असलेलं हे डोंगरगाव आहे. सिल्लोड तालुका दलित अत्याचारग्रस्त तालुका झाला आहे. दलित महिला या राज्यात सुरक्षित नाहीत, कमजोर असणाऱ्यांवर असाच अत्याचार होत राहणार का ? , असे प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केले आहेत. 

असंतोषग्रस्त नागरिकांनी आघाडी सरकारचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
@@AUTHORINFO_V1@@