'लॅप ऑफ ऑनर' या क्षणाला सर्वोच्च क्रीडा सन्मान

    18-Feb-2020
Total Views |

sachin tendulkar_1 &




बर्लिन : भारतरत्न आणि मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याला मैदानातील निवृत्तीनंतर तब्बल साडेपाच वर्षांनंतर त्याच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला आहे. सचिन तेंडुलकरला सहकाऱ्यांनी खांद्यावर घेतलेल्या क्षणाला 'कॅरीड ऑन द शोल्डर्स ऑफ ए नेशन' असे शिर्षक देण्यात आले होते. नऊ वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकरने त्याच्या सहाव्या वर्ल्ड कप स्पर्धेत प्रथमच चषक उंचावला होता. भारताने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर संघातील सहकाऱ्यांनी सचिनला खांद्यावर घेत 'लॅप ऑफ ऑनर' दिला होता. या फोटोला गेल्या २० वर्षातील सर्वोत्कृष्ठ क्रीडा क्षणाचा सर्वोत्कृष्ठ क्रीडा लॉरेन्स पुरस्कार (Laureus Sporting Moment Award) मिळाला आहे.



अनेक वर्ष देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सचिनला तेव्हा आश्रू रोखता आले नव्हते. भारतीय क्रिकेट संघाने २०११ साली वानखेडे मैदानावर श्रीलंकेचा पराभव करून आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. या विजेतेपदानंतर संघातील खेळाडूंनी सचिनला खांद्यावर उचलत मैदानाची फेरी मारली होती. या फोटोला गेल्या २० वर्षातील सर्वोत्कृष्ठ क्रीडा क्षणाचा पुरस्कार मिळाला आहे. काल (१७ फेब्रुवारी) बर्लिन येथे लॉरेन्स जागतिक क्रीडा पुरस्कार सोहळा पार पडला. तेव्हा सचिनला हा पुरस्कार देण्यात आला. लॉरेन्स अकादमीचा सदस्य आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉने सचिन तेंडुलकर संदर्भातील या क्षणाला क्रिकेटमधील सर्वोत्तम क्षण असल्याचे म्हटले होते.



tendulkar_1  H

यापूर्वी ऑस्ट्रेलियाने २००२मध्ये लॉरेन्स अकादमीचा पुरस्कार जिंकला होता. लॉरेन्स पुरस्कारासाठी नामांकन मिळणे ही फार अवघड गोष्ट असते. भारतीय संघाने २०११मध्ये वर्ल्ड कप जिंकणे ही शानदार अशी कामगिरी होती. आम्ही २००२मध्ये सर्वोत्तम संघाचा लॉरेन्स पुरस्कार मिळवला होता तो क्षण देखील असाच होता, असे वॉने म्हणाला.