‘फत्तेशिकस्त’ चित्रपटाचा नवा विक्रम!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Feb-2020
Total Views |

fatteshikast_1  








‘मराठा लाईट इन्फंट्री' मध्ये संग्रहित होणारा शिवकालीन युद्धनीतीवरील पहिला चित्रपट 'फत्तेशिकस्त'

मुंबई : प्रत्येक चित्रपटाचे आपले नशीब असते असे म्हटले जाते. हेच नशीब त्याला कधी तिकीटबारीवर यश मिळवून देते, तर कधी सिनेमहोत्सवांच्या माध्यमातून चित्रपटच्या जाणकारांच्या माध्यमातून पाठीवर कौतुकाची थाप मारते... काही चित्रपट मात्र याहीपेक्षा वेगळे यश मिळवत उत्तुंग भरारी घेत सर्वांसाठी प्रेरणादायी ठरतात. अशा चित्रपटांकडे सर्वांचंच लक्ष वेधले जाते. लेखक-दिग्दर्शक-अभिनेता दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'फत्तेशिकस्त' हा गाजलेला मराठी चित्रपट भव्य-दिव्य यश मिळवल्यानंतर आता एक नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. तमाम शिवभक्त, मराठी जनता आणि सिनेरसिकांचा उर अभिमानाने भरून यावा अशी देदीप्यमान वाटचाल करणाऱ्या या चित्रपटचा समावेश आता 'मराठा लाईट इन्फंट्री'च्या अर्काइव्हमध्ये करण्यात येणार आहे.


ए. ए. फिल्म्स यांच्या सहकार्याने आलमंड्स क्रिएशन्स प्रस्तुत, दिग्पाल लांजेकर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'फत्तेशिकस्त' हा चित्रपट १५ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. धमाकेदार ट्रेलर, लक्षवेधी प्रोमोज आणि रोमांचक संवादांमुळे चित्रपटबाबतची वाढलेली अपेक्षा 'फत्तेशिकस्त'ने पूर्ण करण्यात यश मिळवले. प्रेक्षकांसह सिनेसृष्टीतील जाणकारांनी केलेल्या कौतुकाच्या वर्षावामुळे हा चित्रपट सर्वदूर पोहोचला. तिकीटबारीवरही या चित्रपटाने बाजी मारली. 'फत्तेशिकस्त'च्या यशाची आजवर कधीही समोर न आलेली बाजू म्हणजे बेळगावमध्ये जवळपास ४ हजार भारतीय जवानांनी हा चित्रपट पाहिला होता. सैन्यदलाचे प्रशिक्षण घेणाऱ्या कॅडेट्ससोबतच सैन्यदलातील अधिकाऱ्यांनीही 'फत्तेशिकस्त'चे कौतुक केले. हा चित्रपट त्यांना इतका भावला की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचे दर्शन घडवणारा 'फत्तेशिकस्त' आपल्या आर्काइव्हमध्ये असावा असा निर्णय 'मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट'ने घेतला आहे.


'मराठा लाईट इन्फंट्री' हे भारतीय सेनेतील सैन्यदलातील सर्वात जुने सैन्यदल आहे. १७६८ मध्ये स्थापन झालेल्या या सैन्यदलाची ओळख सुरुवातीला 'ब्रिटिश लष्करातील जंगी पलटण' अशी होती. १८०२ च्या सुमारास याला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला. लाईट इन्फंट्री म्हणजे मोजक्या सैनिकांची चपळपणे हालचाली करणारी पलटण. बेळगावमध्ये असलेल्या या 'मराठा लाईट इन्फंट्री'च्या प्रशिक्षण केंद्रातील अर्काइव्हमध्ये 'फत्तेशिकस्त'चा समावेश करण्यात येण्यामागे एक विशेष कारण आहे. 'फत्तेशिकस्त'मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती, शिवरायांच्या अष्टावधानी नेतृत्वाची, शौर्याची महती, त्यांच्या साथीदारांचा अजोड पराक्रम, गनिमी कावे, युद्धापूर्वीची शिस्तबद्ध तयारी, शत्रूची इत्तंभूत माहिती मिळवून त्याला कोंडीत पकडण्याची कला आणि सहकाऱ्यांच्या मदतीने गनिमावर विजय संपादन करण्याचा ध्यास या गोष्टींचं अत्यंत बारकाव्यानिशी सादरीकरण करण्यात आलेले आहे. 'मराठा लाईट इन्फंट्री'मध्ये सैनिकी प्रशिक्षण घेणाऱ्या प्रत्येक जवानाला छत्रपती शिवरायांची युद्धनीती प्रेरणा देणारी ठरणारी आहे. आजही जगभरातील बलाढ्य राष्ट्र ज्यांची नीती युद्धात वापरत आहेत त्या शिवरायांच्या युद्धनीतीचा अभ्यास मराठा बटालियनमधील सैनिकांना व्हावा या हेतूने 'मराठा लाईट इन्फंट्री'च्या अर्काइव्हमध्ये 'फत्तेशिकस्त' समाविष्ट करण्यात येणार आहे.

लौकीक आणि अलौकीक पातळीवर यशस्वी झालेला, दिग्गज दिग्दर्शकांनी नावाजलेला, तिकीटबारीवर यश संपादन केलेला हा चित्रपट बेळगावच्या द ‘मराठा लाईट इन्फंट्री’ रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडीयर गोविंद कलवाड, डेप्युटी कमांडंट कर्नल पी. एल. जयराम, बेळगावचे समशेर बहाद्दूर हरोलीकर सरकार श्रीमान रमेश केशवराव रायजादे, सेनाखासखेल सत्यशीलराजे दाभाडे आदींच्या प्रयत्नांमुळे 'मराठा लाईट इन्फंट्री'मध्ये समाविष्ट होणार आहे. निर्माता अजय आरेकर - अनिरुद्ध आरेकर यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटत चिन्मय मांडलेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून, त्यांना मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, मृण्मयी देशपांडे, अंकित मोहन, निखिल राऊत, हरीश दुधाडे, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, अक्षय वाघमारे, विक्रम गायकवाड, रुची सावर्ण, अश्विनी कुलकर्णी, नक्षत्रा मेढेकर, प्रसाद लिमये, अमोल हिंगे, ऋषी सक्सेना, सिद्धार्थ झाडबुके, हिंदीतील अनुप सोनी या मातब्बर कलाकारांची साथ लाभली आहे.



@@AUTHORINFO_V1@@