मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्याला राष्ट्रवादीची अनुपस्थिती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Feb-2020
Total Views |
uddhav_1  H x W




महाविकास 
आघाडी केवळ दिखावा; राष्ट्रवादी तालुकाध्याक्षांचा आरोप



मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसाच्या कोकण दौऱ्यावर आहेत. सोमवारी ते रत्नागिरी जिल्ह्यातील विकास कामांची पाहणी करणार आहेत. महाविकास आघाडीतील स्थानिक नेते या दौऱ्यात सामील असतील असा अंदाज बांधला जात होता. मात्र या दौऱ्यावेळी रत्नागिरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित राहणार नसल्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी सांगितले. 


राज्यात जशी महाविकास आघाडी झाली, तशी रत्नागिरीत झालेली नाही. येथे शिवसेनेकडून केवळ आघाडीचा दिखावा केला जात आहे. त्यामुळे अशी आघाडी काय कामाची? असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादीचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी या दौऱ्याला अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले. 


उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत, त्यांचा आम्ही नेहमीच सन्मान करू, मात्र, केवळ देखावा करण्यासाठी गणपतीपुळे येथे अजिबात जाणार नाही. नगराध्यक्षांनी एकही विकासकाम राष्ट्रवादीच्या नागसेव्कांच्या प्रभागांत केलेले नाही. सगळी विकास कामे केवळ शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागात होत आहेत. त्यामुळेच ही फसवी आघाडी मान्य नसल्याचे मयेकर म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@