काशी महाकाल एक्सप्रेसमधील शंकराच्या प्रतिमेवर ओवेसींना आक्षेप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Feb-2020
Total Views |
owaisi_1  H x W





भगवान शंकराच्या आरक्षित आसनाला ओवेसींचा विरोध

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी वाराणसी ते इंदूर दरम्यान धावणाऱ्या काशी महाकाल एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. ही विशेष ट्रेन भगवान शंकरांच्या तिर्थस्थानांना भेट देण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. मात्र आता एका नवीन वादामुळे ही ट्रेन चर्चेत आली आहे. या ट्रेनच्या अनेक वैशिष्ठ्य आणि आकर्षणांपैकी एक म्हणजे यात आसन क्रमांक ६४ शंकरासाठी आरक्षित करण्यात आले आहे.


काशी महाकाल एक्सप्रेसच्या बी५ कोचमध्ये आसन क्रमांक ६४ ला देव्हाऱ्याचे स्वरूप देण्यात आले आहे. रेल्वेमध्ये ही भक्तांना भगवान शंकराचे दर्शन करता यावे म्हणून या जागी भगवान शिव यांचा फोटो ठेवून अध्यात्मिक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.


मात्र, असदुद्दीन ओवैसी यांनी यावर प्रश्न उपस्थित केला आहे. पंतप्रधानांना टॅग करत त्यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी संविधानाची प्रस्तावना जोडली आहे. ‘संविधानाच्या या प्रस्तावनेत सर्व धर्माच्या लोकांसोबत एक समान व्यवहार करण्यास सांगण्य़ात आले आहे’, असे म्हणत त्यांनी याला आपला विरोध दर्शवला.


रविवार काशी दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदी यांनी अनेक योजनांचा शुभारंभ केला. या दरम्यानच त्यांनी काशी महाकाल एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला होता. ही ट्रेन भगवान शिव यांची ज्योतिर्लिंग असलेल्या ओंकारेश्वर, महाकालेश्वर आणि काशी विश्वनाथ यांना जोडते. यांत भक्तांना अध्यात्मिक वातावरण अनुभवण्यासाठी कॅसेटच्या माध्यमातून लोकांना भजन ऐकता येणार आहे.


@@AUTHORINFO_V1@@