नरेंद्र मोदींची बदनामी शशी थरूरांना पडली महागात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Feb-2020
Total Views |

ठर्रू_1  H x W:
 
हजर राहण्यास टाळाटाळ : न्यायालयाने ठोठावला ५००० रुपयांचा दंड 
 भाजप नेते राजीव बब्बर यांनी घेतली होती कोर्टात धाव


दिल्ली (शनिवार दि. १७ फेब्रु.) : दिल्ली न्यायालयाने शनिवारी झालेल्या सुनावणीत कॉंग्रेस खासदार शशी थरूर यांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठवला आहे. शशी थरूर दिल्ली न्यायालयासमक्ष हजर राहत नव्हते. नरेंद्र मोदी म्हणजे पिंडीवरील विंचू आहेत, अशास्वरूपाचे वक्तव्य शशी थरूर यांनी केले होते. त्यानुषंगाने राजीव बब्बर या भाजप कार्यकर्त्यांनी दिल्ली न्यायालयात थरूर यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला होता. त्यावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा आदेश दिला आहे.


ऑक्टोबर २०१८ मध्ये शशी थरूर यांनी नरेंद्र मोदींविषयी हे आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर भाजप नेते राजीव बब्बर यांनी अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. शशी थरुर मात्र या सुनावणीस हजर राहण्यास टाळाटाळ करत होते. यासंबंधी नोव्हेंबर २०१९ मध्ये दिल्ली कोर्टाने शशी थरूर यांच्याविरोधात जामीनपात्र वौरंट काढले होते.


राजीव बब्बर यांनी खटला दाखल करताना , धार्मिक भावना दुखावल्या असे म्हटले आहे. पिंडीसंबधी केलेल्या वक्तव्यामुळे धर्म या नात्याने अवमान झाल्याचा दावा राजीव बब्बर यांनी केला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी ४ मार्च रोजी होणार असून थरूर यांना न्यायालयात हजर राहण्याचे बजावण्यात आले आहे. अतिरिक्त महानगर दंडाधिकारी विशाल पुजारा यांच्या न्यायालयात ही सुनावणी सुरु आहे.
@@AUTHORINFO_V1@@